शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण सेवा सहकारी संस्था मोजताहेत अखेरच्या घटका

By admin | Updated: May 24, 2014 00:05 IST

सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे

 पिंपळखुटा : सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे ग्रामीण सहकारी संस्था आता नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याने अखेरच्या घटका मोजत आहेत. आर्वी ततालुक्यात एकूण ५० सहकारी संस्था आहे. पैकी बैद्यनाथन समिती व ९७ व्या घटनादुरूस्तीनुसार १३ संस्थांचे इतर संस्थेत विलिनीकरण करण्यात आल्याने ३७ संस्था कार्र्यरत असून २० गटसचिव या संस्थेचा कारभार पाहत आहेत. सध्या सहकारी संस्थेचे तालुक्यात ४ हजार ९५६ शेतकरी थकीत कर्जदार आहे. त्यांच्याकडून २७ कोटी ५३ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे. बर्‍याच शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करून राष्ट्रीयकृत बँकेचा रस्ता धरला आहे; परंतु सर्व शेतकरी सभासदाकडून ठेव म्हणून घेतलेली एकूण रक्कम ३ कोटी ७४ लाख रुपये आहे. जे शेतकरी इतर बँकेकडून कर्ज घेतात त्यांचेही शेअर्स या संस्थेत जमा आहे. ही ठेव परत मिळावी या आशेवर शेतकरी आहेत. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)