शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील ‘त्या’ कोविड योद्धांचीही होतेय आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध, फळ व मांस आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉडर सील पॉर्इंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देबॉर्डर सील पॉर्इंटवर राबविला जातोय विशेष उपक्रम : डोळ्यात तेल घालून घेताहेत प्रत्येक वाहनाची झडती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शिवाय वर्धा जिल्ह्याशेजारी असलेल्या नागपूर, अमरावती व यवतमाळ येथून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ऊन, पाऊस आणि वादळाची तमा न बाळगता वर्धा जिल्ह्यातील १७ बॉडर सील पॉॅर्इंटवर पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान हे कोविड योद्धा खडा पहारा देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. याच साहित्याची वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात हे कोविड योद्धा येत असल्याने त्यांचीही आता आरोग्य तपासणी केली जात आहे.नागपूर, अमरावती व यवतमाळ येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शिवाय इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध, फळ व मांस आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉडर सील पॉर्इंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. बॉडर सील पार्इंटवर कर्तव्य बजावत असलेले या कोविड योद्धांचा इतर जिल्ह्यातील व्यक्तींशी थेट संपर्क येत असल्याने या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याची माहीम हाती घेण्यात आली आहे. हिंगणघाट व वर्धा उपविभागातील बॉडर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून पुलगाव व आर्वी उपविभागातील सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्यांची आरोग्य तपासणी लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.१९२ व्यक्तींचा खडा पहारावर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉर्डर सील पॉर्इंटवर एकूण ३२ पोलीस अधिकारी तसेच १६० पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान खडा पहारा देत आहेत. सुरूवातीला या बॉडर सील पॉर्इंटवर १२८ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या सर्व कोविड योद्धांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना मास्क, शिल्ड व सॅनिटायझर वितरीत करण्यात आले आहे.१२८ अधिकारीसह कर्मचारी मुख्यालयीवर्धा जिल्ह्यातील १७ बॉडर सील पॉर्इंटवर सुरूवातीला एकूण १२८ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी दुसरे एकूण १९२ पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहे. तर पूर्वीच्या १२८ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी बोलावण्यात आले आहे. ते निरोगी आहेत काय याची चाचपडताळणी करण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या अधिकारी व कर्मचाºयांना पुन्हा बॉडर सील पॉर्इंटवर पाठविण्यात येणार आहेत.तर सध्या बॉडर सील पॉर्इंटवर कार्यरत असलेल्यांना पुर्वीचे मनुष्यबळ सज्ज झाल्यावर मुख्यालयी पाचारण करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एकूणच आळीपाळीने आरोग्य तपासणी करून हे कोविड योद्धा आपले कर्तव्य बजावणार आहेत.वर्धा जिल्ह्यातील १७ बॉडर सील पॉर्इंटवरील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी.बॉडर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावणाऱ्यांचा थेट सपर्क जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्यांशी येतो. त्यामुळे त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सध्यास्थितीत हिंगणघाट व वर्धा उपविभागातील बॉडर सील पॉर्इंटवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. लवकरच पुलगाव आणि आर्वी उपविभागातील बॉडर सील पॉर्इंटवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस