शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातर्फे वर्धेच्या उमेदवारीवर काथ्याकुट

By admin | Updated: September 27, 2014 02:07 IST

युतीत फाटाफूट झाल्यानंतर वर्धा मतदार संघातील जुने समीकरण जागीच गळून पडले आहे.

वर्धा : युतीत फाटाफूट झाल्यानंतर वर्धा मतदार संघातील जुने समीकरण जागीच गळून पडले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजप माजी खासदार दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक डॉ. पंकज भोयर यांचे नाव अग्रक्रमावर असताना भाजपश्रेष्ठींनी त्यांना डावलून येळाकेळी जि.प. गटाचे सदस्य राणा रणनवरे यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे डॉ. भोयर यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे भाजपाकडून या उमेदवारीबाबत पुन्हा फेरविचार सुरू झाल्याची माहिती आहे.दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हाच युवा कार्यकर्त्यासह डॉ. पंकज भोयर यांनी त्यांचा हात धरून भाजप प्रवेश घेतला. या प्रवेशानंतर भोयर यांचा आमदारकीवर डोळा होता. तेव्हापासूनच त्यांनी वर्धा विधानसभा मतदार संघावर आपले लक्ष्य केंद्रीत करून उमेदवारी मिळविण्याच्या अनुषंगाने भाजपश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती. दुसरीकडे राणा रणनवरे यांच्यासह श्याम गायकवाड हे देखील रांगेत होते. मात्र यात भोयर यांचे नाव भाजपच्या यादीत अग्रक्रमावर असल्याची चर्चाही भाजप गटात होती. अशातच वर्धा जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. यामध्ये भाजपाने राणा रणनवरे यांच्या पत्नी हिंगणी जि.प. गटाच्या सदस्या चित्रा रणनवरे यांना अध्यक्षपदी विराजमान केले. तेव्हापासून राणा रणनवरे यांच्या नावाची विधानसभा उमेदवारीसाठी सुरू असलेली चर्चा थांबली. भाजप-सेना युती तुटण्याच्या दिवसापर्यंत भोयर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात होते. मात्र रात्रीला नागपूरात झालेल्या अंतर्गत घडामोडीनंतर एकाएकी डॉ. पंकज भोयर यांना वगळून राणा रणनवरे यांच्या नावावर भाजप श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. याला रणनवरे यांनीही दुजोरा दिला. यामुळे वर्धेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भोयर यांनी दोन महिन्यांपासून वर्धा मतदार संघ पिंजून काढला होता. इतकेच नव्हे, तर पक्षाचे चिन्ह असलेले मतदार कार्ड देखील मतदारांपर्यंत पोहचविले होते. अशातच भाजपकडून रणनवरे यांचे नाव पुढे आल्यामुळे नाराजीचा सूर उमटायला सुरूवात झाली. ही बाब लक्षात येताच भाजपश्रेष्ठी या निर्णयावर फेरविचार करीत असल्याची भारतीय जनता पक्षाच्या गोटातील माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)