कामगंध सापळे निष्प्रभ; बोंडअळीचे सावट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:42 IST2018-08-30T22:40:41+5:302018-08-30T22:42:35+5:30
मागील वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसानीचा कडू अनुभव पाठीशी असतानाही रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणात यावर्षीही लागवड केली. कापसाचे पीक पाती- फुले बहरले असतानाच पुन्हा याहीवर्षी अनेकांच्या कापूस पिकात बोंडअळीचा प्रार्दुभाव दिसला.

कामगंध सापळे निष्प्रभ; बोंडअळीचे सावट कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : मागील वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसानीचा कडू अनुभव पाठीशी असतानाही रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणात यावर्षीही लागवड केली. कापसाचे पीक पाती- फुले बहरले असतानाच पुन्हा याहीवर्षी अनेकांच्या कापूस पिकात बोंडअळीचा प्रार्दुभाव दिसला. शेतकऱ्यांनी ओरड सुरू केली. कृषी विभागाने शेत शिवार पाहणी करीत कामगंध सापळे लावण्याचा व फवारणीत निंबोळी अर्काचा वापर करण्याचा सल्ला दिला. एक महिनाभऱ्यापासून शेतकरी कृषी विभागाचा सल्ला अंगीकारत आहे. पण कामगंध सापळ्यांचा फारसा उपयुक्त परिणाम दिसून येत नसल्याचे शेतकरी सांगत असून बोंडअळीचे सावट कायम असल्याचे ऐकायला मिळत आहे.
कामगंध सापळ्यातील कॅप्सूलच्या वासाकडे बोंडअळीचा नर सापळ्यात अडवतो. त्यामुळे पुढील प्रजनन व होणारा विस्तार थांबतो असा कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावले. प्रत्येक फवारणीत निंबोली अर्काचा वापर केला. पण रोहणा परिसरात अनेक शेतकरी सापळ्यातील बोंडअळीच्या किडीचे नर जमा न झाल्याचे सांगत आहे. बºयाच शेतात बोंडअळीचा प्रभाव कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
पीकवरून पाहण्यासाठी उत्तम दिसत असल्याने शेतकरी रासायनीक खते, फवारणी, निंदन, डवरणी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असला तरी भविष्यात बोंडअळीचा प्रभाव वाढला व मागच्या वर्षीचीच अवस्था झाली तर कापसाच्या उत्पन्नात किती तोटा येईल. या कल्पनेने अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.
जूनच्या सुरुवातीच्या पावसानंतर पेरणी केलेले कापसाचे पीक दुरून पहायला खुप चांगले दिसत आहे. ही काहीशी समाधानाची बाब असली तरी सुरुवातीच्या पावसानंतर १५-२० दिवसाचा खंड पडल्याने अनेक शेतकºयांना २६ जून नंतर कापसाची लागवण करावी लागली. अशा उशीरा लागवड झालेल्या कापसाच्या शेतातील पिके फारशी वाढली नाही.