बस उलटली; प्रवाशी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:37 IST2018-10-10T00:37:04+5:302018-10-10T00:37:45+5:30
नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली.

बस उलटली; प्रवाशी बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली. पण, दैव बलबत्त असल्याचे बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भरधाव असलेली एम. एच. २० बी. एल. १७४६ क्रमांकाची बस वर्धा-नागपूर मार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ आली असता वाहन अनियंत्रित होत पलटी झाले. या अपघातात बसचा पूर्णत: चुराडा झाला असला असून बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. अपघातानंतर सर्व प्रवासी बसमधून सुखरुप बाहेर पडले. त्यानंतर प्रवाशांनी अन्य वाहनाने नियोजित ठिकाण गाठले. माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस जामदार मेघरे करीत आहेत.