शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जबलपूर एक्स्प्रेस’च्या तात्पुरत्या थांब्याला अखेर मंजुरी

By admin | Updated: October 19, 2015 02:25 IST

गत अनेक वर्षांचे प्रयत्न आणि प्रवाश्यांच्या पाठपुराव्यामुळे जबलपूर-अमरावती या एक्स्प्रेस गाडीचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे

प्रवासी उत्सुक : २७ आॅक्टोबरपासून थांबणार गाडीसिंदी (रेल्वे) : गत अनेक वर्षांचे प्रयत्न आणि प्रवाश्यांच्या पाठपुराव्यामुळे जबलपूर-अमरावती या एक्स्प्रेस गाडीचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. यामुळे प्रवाश्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली असून गाडीच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसचा येथील स्थानकावर दोन्ही दिशेचा थांबा मंजूर केला ओ. रेल्वे प्रशासनाने तशा आशयाचे पत्र येथील स्टेशन मास्तरला पाठविले आहे. या पत्रावर आमदार समीर कुणावार, खासदार रामदास तडस यांनी समाधान व्यक्त केले. शिवाय मंगळवारी गाडीचे स्वागत करण्यासाठी ते येथे जातीने उपस्थित राहणार आहेत. सदर एक्स्प्रेसला येथील स्थानकावर रितसर थांबा मिळावा, यासाठी विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळ व अनेक संघटनांनी प्रयत्न चालविले होते. या भागाचे आ. कुणावार यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांकडून २३ जुलै रोजी एक पत्र ना. सुरेश प्रभु यांना पाठविले होते; पण रेल्वे प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. ना. नितीन गडकरी यांनीही सुरेश प्रभु यांचे याकडे लक्ष वेधले होते. .तथापि, येत्या २७ आॅक्टोबरपासून ही गाडी अजनी, सिंदी (रेल्वे) आणि चांदूर (रेल्वे) या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. हा थांबा तात्पुरता असल्याचे रेल्वे प्रशासनाने त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे. स्थानिक विद्यार्थी, प्रवासी मित्र मंडळाने मंगळवारी सकाळी ७ वाजता अमरावतीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे स्वागत करण्याची तयारी चालविली आहे. येथून सुमारे ६४५ विद्यार्थी वर्धेला ये-जा करतात.(प्रतिनिधी)