शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

लोकप्रतिनिधींनाच रस्त्यावर यावे लागते हे दुर्भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:46 AM

शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. ती जर नगर प्रशासन पूर्ण करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते. या देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार ....

ठळक मुद्देरणजित कांबळे : जिल्हाधिकाºयांशी चर्चेनंतर पाचव्या दिवशी उपोषणाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. ती जर नगर प्रशासन पूर्ण करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते. या देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक प्रशासनाच्या कामांचा लेखाजोखा मागण्याचा सर्वांना अधिकार आहे; पण नगर परिषदेने विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं लोकांच्या समस्यांसाठी लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते, हे लोकशाहीत दुर्भाग्य आहे, असे मत आ. रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.१३ डिसेंबरपासून पालिकेतील बसपा, काँग्रेस व अपक्ष यांच्या आघाडीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. नगरसेवक कुंदन जांभुळकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी रविवारी आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते सरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी आ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करीत मागण्या कळविल्या. काही समस्यांबाबत आश्वासन मिळाल्याने नगरसेवक कुंदन जांभुळकर व सहकाºयांनी उपोषण मागे घेतले.आ. कांबळे यांनी शासनाच्या ज्या योजना असतात, त्या जनतेच्या पैशाने जनतेसाठी राबविल्या जातात. त्यात गैरप्रकार होत असेल तर माहितीचा अधिकार राज्यघटनेनेने सर्वांना दिला. सुभाषनगर येथील अतिक्रमणग्रस्त विस्थापितांना रमाई घरकूल योजनेत घरे बांधून देण्याचा प्रश्न पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांच्या मध्यस्थीने समाजकल्याण वर्धा यांनी दिलेल्या पत्रामुळे निकाली निघाला. स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे यांचा पदभार अनिल अंबादे यांना दिल्याचे लेखी पत्र दिले. अन्य समस्यांवर आ. कांबळे यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली असून त्या सोडविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.ठाणेदार बुराडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी काँग्रेसचे नेते मनोज वसू, शहराध्यक्ष रमेश सावरकर, महासचिव अश्विन शाह, मौला शरीफ, महेश तेलरांधे, अशोक इंगळे यासह गटनेते डॉ. प्रमोद नितनवरे, प्रकाश टेंभुर्णे, शोभा ठवकर, करुणा राऊत, जमना खोडे, रितेश मडावी, चंद्रकांत डोईफोडे व बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगर प्रशासनातर्फे कुणीही उपस्थित नसल्याने कुजबूज होती.

टॅग्स :Ranjit Kambaleरणजित कांबळे