औरंगाबाद येथून सुरू झाले अभियान वर्धा : महाराष्ट्रात एडस् झपाट्याने वाढत आहेत, केवळ कागदोपत्री आकडेवारी दाखविली जात असून प्रत्यक्ष स्थिती लपविण्यात आल्याने आज काही कारण नसतांना अनेक कोवळी फुले जन्मल्याबरोबर कोमेजली आहे. या भयानक परिस्थितीतून भारताला मुक्त करण्याचा संकल्प केलेला एक ध्येयवेडा वाटसरू दुचाकीने काल रविवारी वध्र्यात पोहोचला. त्याने सुरू केलेल्या अभियानाचा हा १९ हा दिवस असून या दिवसात त्याने ११६ गावात जनजागृती केली. येथून आता चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनकडे तो प्रयाण करणार आहे.आदेश आटोटे या ३0 वर्षाच्या आतील युवकाने आपले स्वप्न साकार करण्याच्या दिवसात देशाचा, समाजाचा विचार करून भारताला एडस् मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पातून त्याने कमृभूमी ते जन्मभूमी, औरंगाबाद ते संपूर्ण महाराष्ट्रभर एडस् मुक्त भारत मोटारसायकल अभियान सुरू केले. या अभियानाची सुरुवात २0 मे रोजी औरंगाबाद येथून झाली. आज तो कडाक्याच्या उन्हात वर्धेला येवून पोहचला. या दरम्यानच्या काळात त्याने ११६ गावात भेट देवून जनजागृती केली. रविवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देवून तो बाबा आमटे यांच्या आनंदवनला रवाना झाला. हे अभियान महाराष्ट्रभर जावून यशस्वी करायचे असल्याचे सांगूण महाराष्ट्रातील गावखेड्यात जास्त भर देत आहे. कारण शहरात मानुसकी हरपली असून ती खेड्यात जिवंत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. रात्र झाली तिथे मुक्काम, मिळेल तिथे थांबा आणि देईल ते खाने त्याचा नित्यक्रम असून केवळ दुचाकी आणि एक बॅग हेच सोबतीला आहे.(प्रतिनिधी)
एडस्च्या जनजागृतीकरिता ‘तो’ फिरतोय दुचाकीवर
By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST
महाराष्ट्रात एडस् झपाट्याने वाढत आहेत, केवळ कागदोपत्री आकडेवारी दाखविली जात असून प्रत्यक्ष स्थिती लपविण्यात आल्याने आज काही कारण नसतांना अनेक कोवळी फुले जन्मल्याबरोबर कोमेजली आहे.
एडस्च्या जनजागृतीकरिता ‘तो’ फिरतोय दुचाकीवर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}