शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीला अद्यापही सिंचनाचाच आधार

By admin | Updated: June 22, 2016 01:57 IST

मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही.

पावसाची प्रतीक्षा कायमच : मान्सून अद्याप न स्थिरावल्याने पेरण्या लांबणीवरवर्धा : मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही. एकही पाऊस चांगला न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करण्यास धजावलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जी अत्यल्प पेरणी झाली आहे व होत आहे त्याला सिंचनाचाच आधार आहे. त्यांच्याही नजरा आता आकाशाकडे वळल्या आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हात पोळून बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. मान्सूनपूर्व पेरणी तर जिल्ह्यात खूपच अत्यल्प झाली. त्यानंतर मान्सून दाखल झाला या भावनेने बळीराजा सुखावला खरा; पण पाऊस अद्याप स्थिरावला नाही. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका अश्या सूचना कृषी विभागानेच दिल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अश्या काहीच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण त्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने संपूर्ण मदार सिंचनावरच आहे. परिणामी आकाशात ढग गोळा झाले असतानाही अनेक शेतात स्प्रिंक्लरद्वारे कापाशीला सिंचन केले जात आहे. हेदेखील जास्त दिवस शक्य नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे असून प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील काहीच भागात तुरळक पेरण्या झाल्या आहेत. पण दमट वातावरणामुळे ही पिकेही धोक्यात आहेत. त्यामुळे पेरणी चांगल्या पावसानंतरच अशी भूमिका घेतली जात आहे.(शहर प्रतिनिधी) चांगल्या पावसाशिवाय पेरणी नाहीआकाशात काळे ढग गोळा होऊ लागले की आता पाऊस येणारच अशी आशा बळीराजाला असते. त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी पूर्वी शेतकरी पेरणीला सुरुवात करायचा. पण या काही वर्षात पावसाची हुलकावणी सर्वांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बळीराजाने अनेकवार झेलले आहे. पण आता ती ताकत नसल्याने जोपर्यंत मनासारखा पाऊस येत नाही तोपर्यंत पेरणी करायचीच नाही अशी ठोस आणि सावध भूमिका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी विभागानेही अश्याच सूचना दिल्यामुळे उशीर झाला तरी चालेल पण पेरणी नाहीच असे शेतकरी सांगत आहे. सिंचनाच्या भरवश्यावर पेरणी करणारेही आकाशाकडे पाहात आहेत.