प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहतूक होते प्रभावितपुलगाव : शहरातील रस्ते व बाजारपेठ विद्यार्थी व पालकांनी गजबजलेली आहे. शहरातून हैदराबाद, भोपाळ व नागपूर, मुंबई हे महामार्ग जातात. या दोन्ही महामार्गावर जड वाहनाची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रेल्वे स्टेशन ते नाचणगाव व कॉटन मील ते नगर परिषद हायस्कूल या मार्गावर रेल्वे व बसचे प्रवासी, शाळा व महाविद्यालयीन, विद्यार्थी यांचीही वर्दळ असते. यातच दोन्ही मार्गावर रस्त्याच्या मध्यापर्यंत उभी राहणारी वाहने अपघातास निमत्रंण देत आहेत. शहरातील या दोन्ही मार्गावर शाळा, महाविद्यालय, बँक, दवाखाना, न्यायालय, रेल्वे, बसस्थानक व व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. शहरातील बाजार पेठेत शैक्षणिक विद्यार्थी व पालकांची गर्दी असते. शहरात वाढलेली वाहनाची संख्या तसेच शाळकरी मुलांपासून तर महिला व आबालवृद्धापर्यंत होणारा वाहनाचा वापर पाहता या दोन्ही मार्गावर तासनतास उभी राहणारी वाहने लहान मोठ्या अपघातास निमत्रंण देत आहेत. शिवाय स्टेशन चौकात येणाऱ्या प्रवाश्यांची वर्दळ, वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे दुचाकी वाहनचालकांना व प्रवाश्यांना मार्ग काढणे कठीण जाते. रेल्वे फाटक तासनतास बंद राहते. परिणामी भोपाळ कडून ये का करणाऱ्या वाहनांची लाबलचक रांग असते. उड्डाण पुलाचा प्रश्न अद्यापही न सुटल्याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी काही ढोस पावले उचलणे गरजेचे आहे. पण ती उचलण्यात येत नसल्याने हा तिढा वाढतच चालला आहे. परिणामी वाहतुकीचा तिढा वाढतच चालला आहे.(तालुका प्रतिनिधी)
रस्त्याच्या मधोमध उभ्या वाहनांमुळे अपघातास निमंत्रण
By admin | Updated: October 28, 2015 02:30 IST