शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकांवर किटकांसह किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २१,२,९९४.९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सध्या निंदन, खत देणे आदी कामे युद्धपातळीवर केली जात आहेत.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा फटका : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, कृषी विभाग सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. अशातच उभ्या पिकांवर सध्या किटकांसह किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागानेही हवालदिल शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची गरज आहे.यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २१,२,९९४.९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सध्या निंदन, खत देणे आदी कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. काही ठिकाणी कपाशी पात्या व फुल येण्याच्या अवस्थेत असली तरी आर्वी तालुक्यात काही ठिकाणी या पिकावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. तर जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाची वाढ बऱ्यापैकी झाल्यावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.अशा कराव्या उपाययोजनाज्या भागात कपाशी पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत त्या भागातील शेतकºयांनी अ‍ॅसीफेट ७५ एस.पी. किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० मि.ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करावी. तसेच सायोबीन पिकांवर चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायझोफॉस २० मि.ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून त्याची फवारणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.५६,२२२.२ हेक्टरवर तुरीची लागवडजिल्ह्यात यंदा ५६,२२२.२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली आहे. योग्य निगा राखल्या गेल्याने या पिकांची वाढ सध्या समाधानकारक झाली आहे. निंदन, खत देण्याचे काम सध्या शेतकऱ्यांकडून पूर्णत्त्वास नेले जात आहे.सोयाबीनवर चक्रीभंूगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव१३,८,८८१.०५ हेक्टरवर यंदा सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. असे असले तरी आर्वी तालुक्यातील काही भागासह जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी सोयाबीन पिकांवर चक्रीभूंगा व खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती