शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

‘त्या’ बियाण्यांप्रकरणी अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:33 AM

कपाशीच्या बीटी बियाण्यांवर किमान १२० दिवस अळ्यांचा आणि कुठल्याही किडीचा हल्ला होत नाही, असे सांगून शेतकºयांना कावेरी सिड्स व बायर इंडिया लिमी. या कंपनीने बियाणे दिले.

ठळक मुद्देशेतकºयांची तक्रार : १२० दिवसात बीटीवर बोंडअळी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशीच्या बीटी बियाण्यांवर किमान १२० दिवस अळ्यांचा आणि कुठल्याही किडीचा हल्ला होत नाही, असे सांगून शेतकºयांना कावेरी सिड्स व बायर इंडिया लिमी. या कंपनीने बियाणे दिले. या बियाण्यांवर वेळेच्या पूर्वीच अळ्यांनी हल्ला चढविला. यामुळे शेतकºयांनी या कंपनीविरोधात सामुहिक तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाअंती या कंपनीवर गुरुवारी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईचा निर्णय झाला आहे.विजयगोपाल, देवळी परिसरातील शेतकरी विजय पेटकर व अशोक मारोटकर या शेतकºयांनी त्यांच्या शेतात मे. कावेरी सिड कंपनी लि. या कंपनीचे कापूस बियाणे मनीमेकर बी.जी. २, लॉट नं. १३००९ या वाणाची लागवड केली. कंपनीच्या दाव्याच्या विपरीत १२० दिवसांच्या आत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवून कापूस पिकांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त याच परिसरातील शेतकरी विजय पेटकर, अशोक मारोटकर व श्रीकांत शिरे यांनी त्याच्या शेतातील इतर जागेत मे. बायर इंडिया लिमी. या उत्पादक कंपनीचे कापूस बियाणे सुपर्ब बी.जी. २, लॉट नं. ४७२९००५ व बायर ७५७६, लॉट नं. १७४९६००१४ या वाणांची लागवड केल्याने कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १२० दिवसाच्या आत होवून नुकसान झाल्याने एकूण ३६ शेतकºयांनी सामुहिक तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.तक्रारीवरुन बीज निरीक्षक तथा कृषी अधिकाºयांनी प्राथमिक व नंतर जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पाहणी दरम्यान कावेरी सिड व मे. बायर क्रॉप सायन्स लिमी. मुंबई या कंपनीचे बियाणे शेतकºयाने लागवड केल्याने पिकांवर १२० दिवसाच्या आत गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले.झालेल्या चौकशीअंती कावेरी सिड व मे. बायर क्रॉप सायन्स लिमी. मुंबई यांनी बियाणे कायदा १६६ चे कलम ६(ए), ६(बी), ७(ए), ६(सी) बियाणे नियम १९६८ चे नियम ७, ८ महाराष्ट्र कापूस बि बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या मितीचे निश्चितकरण यांचे विनियमन) अधिनियम २००९ चे कलम ४(१)(२), १२(१),१२(२)(ए), १२(२)(डी), १२(२)(एफ), १२(२)(जी) तसेच नियम २०१० चे ३(१)व ३(२) चे पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत पर्यावरण संरक्षण अधिसुचना दि. ५ डिसेंबर १९८९ कलम ७, ८,९,१० चे आय पी सी ४०६ व ४२० चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक प्रदीप म्हसकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा यांनी कावेरी सिड कंपनी लि. व मे. बायर क्रॉप सायन्स लि. या कंपन्यांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन देवळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर प्रकरणी न्यायालयाची परवानगी घेवून पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.पाशा पटेल यांनी दिली होती भेटदेवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकºयांनी त्यांच्या शेतात लावलेल्या बीटी कपाशीवर बोंडअळी आली होती. याची तक्रार पोलिसात करूनही गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या शेतकºयांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. येथूनच त्यांनी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे.