शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ

By admin | Updated: October 16, 2015 02:57 IST

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे.

उन्हाच्या तडाख्याने संकट : ओलिताकरिता पाणी सोडण्याची मागणी पवनार : उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी तुरीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे ओलिताकरिता सिंचन विभागाने पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी सोडण्याकरिता किमान २५ टक्के शेतकऱ्यांची मागणी असणे गरजेचे असल्याचे म्हणत सिंचन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यास नकार देण्याचा सूर आवळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. महाकाळी धरणावरून धाम मुख्य कालवा असून सदर कालव्याद्वारे खरांगणा, आंजी येळाकेळी, पवनार, मांडगाव परिसरातील शेतकऱ्यांची सिचंनाची सोय होते. धरणसुद्धा १०० टक्के भरलेले असताना रब्बी हंगाम सुरू न झाल्याने कालव्याला पाणी सोडले जात नाही. कालव्याला कपाशी, तूर या पिकासाठी पाणी सोडले तर परिसरातील हजारो हेक्टर पिकाला त्याचा फायदा होईल. परंतु जलसिंचन विभाग मात्र शेतकऱ्यांवर कृपादृष्टी करायला तयार नसल्याचे निदर्शनात येते. मध्यंतरी पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक हातचे गेले. एकरी एक क्विंटलचा ही उतारा नसल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. त्याची भिस्त आता कपाशी, तूर या पिकावर आहे. उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच कपाशीचा पुरता श्रुंगार खाली आला होता व आता वाढत्या उन्हामुळे प्रचंड प्रमाणात पाती गळ होत आहे, तर जमिनीतील ओल आटल्यामुळे तुरीचीही पिकाचीही वाढ खुंटली आहे. अशावेळेस कालव्याद्वारे पाणी देणे गरजेचे आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविते, परंतु त्याला जे पाहिजे ते देत नाही ही वस्तुस्थिती आहे. कपाशी व तुरीकरिता पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.(वार्ताहर)