शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालय बंद उत्स्फूर्त

By admin | Updated: July 23, 2014 23:44 IST

महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनेतर्फे ओबीसी विद्यार्थ्यांच्यावतीने बुधवारी समुद्रपूर, हिंगणघाट व वर्धा येथे शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाच्यावतीने

विविध संघटनांचे आंदोलन : एकदिवसीय धरणे; निवेदन सादरवर्धा : महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनेतर्फे ओबीसी विद्यार्थ्यांच्यावतीने बुधवारी समुद्रपूर, हिंगणघाट व वर्धा येथे शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तीनही संघटनांचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचा आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता. महाविद्यालय बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महात्मा फुले समता परिषद, ओबीसी संघटना आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्यावतीने विदर्भात बुधवारी शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. त्यानुसार वर्धा येथे महात्मा फुले समता परिषद व ओबीसी विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालये बंद केली. यानंतर मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा संघटक विनय डहाके यांनी निवेदन सादर केले़ यात ओबीसी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, ओबीसी शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादेचा सहा लाखांचा शासन निर्णय त्वरित काढावा, अनु़ जाती, जमातीप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी जणगणना करावी, ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापित करावे आदींसह अन्य मागण्यांचा समावेश होता. यावेळी संजय मस्के, शैलेश येळणे, गजानन देशमुख, श्याम जगताप, भास्कर नेवारे यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते व ओबीसी विद्यार्थी उपस्थित होते.समुद्रपूर येथेही महात्मा फुले समता परिषदेंतर्गत ओबीसी संघटना व विद्यार्थी संघटनेच्यावतीने शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ओबीसी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डगवार, रोहीत काळे, आशिष चव्हाण, प्रफूल्ल लढी, चेतन भुरे, गजू काळे, हर्षदा खाडे, सौरभ साळवे, संदीप घरडे, अतुल कुंचलकर, गजानन वाघमारे आदी सहभागी झाले़ मराठा सेवा संघाचे धरणेविविध मागण्यांकरिता मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिजाऊ ब्रिगेड, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय मराठा महासंघ, पद्मश्री विखे पाटील कृषी परिषद, छत्रपती संभाजी युवा संघटनेद्वारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना देण्यात आले. यावेळी राजाभाऊ वानखेडे, संजय मिसाळ, सुधीर पांगुळ, सुधीर गिऱ्हे, शेषराव शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़(लोकमत न्यूज नेटवर्क)