शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगावातील ‘त्या’ रोहित्राकडे दुर्लक्ष

By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST

सेलूपासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या व रेहकी वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंतरगाव येथील रोहित्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे़ शेतात तारा लोंबकळत असून रोहित्र

घोराड : सेलूपासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या व रेहकी वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंतरगाव येथील रोहित्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे़ शेतात तारा लोंबकळत असून रोहित्र सताड उघडे आहे़ यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ वीज कंपनीने या अनागोंदीकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़अंतरगावनजीक राऊत यांचे शेत आहे़ भंगार अवस्थेत असलेल्या या रोहित्रावरून गावाला व कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. या भंगार व उघड्या रोहित्राबाबत शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी रेहकी येथील सहायक अभियंत्यांकडे केल्यात; पण त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली़ याच रोहित्रावरून समोर गेलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारा शेतात लोंबकळत आहे़ या तारांना कधी हात लागेल, हे सांगता येत नाही़ येथे कार्यरत लाईनमन सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले़ त्यांच्या रिक्त जागेवर अतिरिक्त लाईनमनही दिला; पण ते अनुपस्थित असतात़ वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून ग्रामस्थांना कधीकाळी रात्र अंधारात काढावी लागते. लाईनमन राहत नसल्याने या रोहित्रावर फ्युज टाकणे तारेवरची कसरत असते़ शिवाय रोहित्रातील फ्युजला लाकडी फळीचा टेकू लावून आधार द्यावा लागत आहे. रेहकीपासून अंतरगाव पाच किमी असून सहायक अभियंत्याचा पदभार पवनार येथील सहायक अभियंताकडे आहे़ यामुळे ते पावनारवरून अंतरगाव या १३ किमी लांब गावाचा कारभार सांभाळतात़ यामुळे रेहकीला पूर्णवेळ सहायक अभियंता द्यावा, अशी मागणी होत आहे़ शिवाय उघडे असलेले भंगार रोहित्र त्वरित दुरूस्त करून तारा व्यवस्थित कराव्या, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)