हिंगणघाटातील मिलन सुपर शॉपीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 09:46 IST2019-09-30T09:42:04+5:302019-09-30T09:46:52+5:30
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

हिंगणघाटातील मिलन सुपर शॉपीला भीषण आग
हिंगणघाट: महावीर भवन जवळील मिलन सुपर शॉपीमध्ये आग लागून किराणा आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे वृत्त आहे. पहाटे चारच्या सुमारास शॉपीला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुपर शॉपीमध्ये मुथा कुटुंब वास्तव्यास होतं. आग लागल्याचं दिसताच लोकांनी मुथा कुटुंबातील सदस्यांना तातडीनं बाहेर पडण्यास मदत केली. पण त्यांच्या वृद्ध आईस मात्र ते वाचवू शकले नाहीत. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत शॉपीमधलं सारं साहित्य जळून खाक झालं.
मिलन सुपर शॉपी शहरातील मोठं व खूप वर्षांपासून सुरू असलेलं किराणा दुकान आहे. काळाच्या ओघात त्या किराणा दुकानाचे सुपर शॉपी मॉलमध्ये रुपांतर झालं. शॉपीच्या आजूबाजूला दुकानाची रांग आहे. वेळीच आग आटोक्यात आल्यानं आणखी नुकसान टळलं.