शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पीक अन् भावही कमी, सांगा जगावे तरी कसे!

By admin | Updated: November 22, 2014 23:05 IST

सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज,

काढणीचाही खर्च निघत नसल्याने सोयाबीन शेतातच वखरलेवर्धा : सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज, अशा बिकट स्थितीत जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीपाची ही स्थिती लक्षात घेवून शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दर देण्याची अपेक्षाही धूसरच असल्याचे चित्र आहे. पूर्वी पावसाने मारलेल्या दडीमुळे पेरण्या मोडकळीस आल्या. यात आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. तिही उगविली नाही. पुन्हा कर्ज घेऊन तिबार पेरणी केली. ती कशीबशी उगविली; मात्र उशिर झाल्याने उत्पन्नाची आशा राहिली नाही. काही भागात सोयाबीन उगविले, त्याची वाढच झाली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीचे हे पीक असल्याने दिवाळीच्या पूर्वी ते निघण्याची वेळ आली. अशात सोयाबीनची वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांनी त्याची सवंगणी करण्याचे टाळले. काहींनी हिंमत करून सोयाबीनची कापणी केली. यात सोयाबीनचा दाना ज्वारीसारखा झाला. हा दाना पाहून शेतकऱ्यांची आशा मावळली. उत्पन्न निघणार नसल्याचे लक्षात येताच काही गावातील शेतकऱ्यांनी सवंगणी करण्यापेक्षा त्याची वखरणी करण्याचा निर्णय घेतला. हिच स्थिती कपाशीची झाली. उन्ह पावसाच्या खेळात कपाशीवर पहिले मर रोग, नंतर लाल्याचा हल्ला झाला. यात उत्पन्न होणार नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. दिवाळी झाली तरी बाजारात कपाशीचे बोंड आले नाही. यामुळे यंदाच्या सत्रात कपाशीचे उत्पन्न कमी होणार हा अंदाज व्यापाऱ्यांना आला. त्यांनी याचवेळी शेतकऱ्यांची लुट करण्याचा निर्णय घेतला. अशात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल असे वाटत असताना तसे झाले नाही. शासनाने जाहीर केलेला हमीभाव त्याच्याकरिता अत्यल्प ठरला. या हमीभावानुसार खरेदी होईल असे वाटत असताना कापूस खरेदी करणाऱ्या शासनाच्या एजन्सींनी शेतकऱ्यांना धोकाच दिला. त्यांच्याकडूनही अत्यल्प दरात कपाशीची खरेदी होवू लागली. यात शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली. अशात बऱ्याच गावाची आणेवारी ५० च्या आत आल्याने मदतीची आशा वाढली, एवढेच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या बाजूने झाले.