शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वांसाठी घरे’ योजनेत हिंगणघाट पालिका समाविष्ट

By admin | Updated: May 1, 2016 02:12 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी राज्यातील २२६ पैकी २५ नगर परिषदांची निवड झाली.

पत्रकार परिषद : रविवारी होणार योजनेचा शुभारंभहिंगणघाट : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी राज्यातील २२६ पैकी २५ नगर परिषदांची निवड झाली. यात हिंगणघाट न.प. चा समावेश आहे. या योजनेचा शुभारंभ १ मे रोजी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी न.प. सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सदर योजना विशेषत: नागरी क्षेत्राकरिता लागू झाली असून राज्यातील सर्व २६ महानगरपालिका तसेच एकूण ३२१ नगर पंचायती व नगर परिषदांपैकी २५ नगर परिषदांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात वर्धा व हिंगणघाट न.प. या योजनेत सहभागी करण्यात आल्या आहेत. सदर योजना ४ घटकांत असून पहिला घटक शासन अधिकृत झोपडपट्टीतील घरासाठी ३२३ चौ. फुटाच्या बांधकामासाठी २ लाख रुपयांच्या अनुदानाची तरतूद केली आहे. दुसऱ्या घटकातील लाभार्थ्यांना ६४४ चौ. फुट चटई क्षेत्रासाठीच्या बांधकामासाठी ६ लाखांपर्यंतच्या कर्जावर ६.५ टक्के व्याज दराने शासन १५ वर्षेपर्यंत व्याज भरणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना २४ लाखांपर्यंत कर्ज घेण्याची तरतूद आहे; पण ६ लाखांपेक्षा अधिक कर्जाच्या वरची परतफेड लाभार्थ्याला करावी लागणार आहे. तिसरा घटक खासगी विकासाच्या साह्याने ३२३ चौ.फुट बांधकामासाठी २.५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. चवथ्या घटकातील लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या जागेवर घराच्या बांधकामासाठी २.५ लाख रुपयांचे अंशदान बांधकामाचे प्रगतीनुसार देण्यात येणार आहे. या गटातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे. लाभार्थ्यांच्या प्रस्तावाची छाननी व योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम अमरावतीच्या ‘वास्तू क्रिएशन’ या एजन्सीला दिले आहे. यापूर्वी वाल्मिकी आवास योजनेंतर्गत राज्यात ८४ हजार घरकूल झाले. हिंगणघाट पालिकेने ११५० घरकुलांचे बांधकाम केले होते. त्यावेळी २००५ मध्ये नगराध्यक्ष अ‍ॅड. कोठारी होते. अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सांगत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अ‍ॅड. कोठारी यांनी केले. यावेळी न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, सभापती गीता मांडवकर, सभापती बादलसिंग रेवते, सभापती सोनाली सुटे, नगरसेवक बळराज अवचट, शंकर मोहमारे, दशरथ ठाकरे, बालाजी गहलोत आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)लागणारी कागदपत्रे व प्रक्रियायोजनेतील घरासाठी इच्छुकांना घर टॅक्स पावती, जागेचा पट्टा, खसरा, नकाशा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, घरासमोर उभा असलेला लाभार्थ्याचा फोटो, आधार कार्ड, बँकेचे खाते आदी कागदपत्रे द्यावी लागणार आहे. १ मे पासून न.प. कार्यालयात अर्ज वितरित होणार आहे. ३० मे पर्यंत कागदपत्रांसह सादर अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून मंजुरीनंतर केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.