शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हे राम...! काँग्रेस नेत्यांकरिता ‘बापू’ केवळ नावापुरतेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. यात काँग्रेसच्यावतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आजी-माजी व पदाधिकारी उपस्थित राहून आदरांजली अर्पण करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. लहान-मोठे कार्यक्रम आणि विविध बैठकांसाठी सतत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे पालकमंत्रीही आज सेवाग्राम आश्रमात दिसले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनामित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सेवाग्राम आश्रम परिसरात अखंड सूत्रयज्ञ, सामूहिक प्रार्थना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, या दिवसभराच्या कार्यक्रमादरम्यान   जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून काँग्रेसचे आजी-माजी आमदार तसेच पदाधिकारीही आश्रमाकडे भटकलेच नाहीत. त्यामुळे ‘काँग्रेस नेत्यांकरिता ‘बापू’ केवळ नावापुरतेच?’ अशी चर्चा रंगली होती.देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. यात काँग्रेसच्यावतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आजी-माजी व पदाधिकारी उपस्थित राहून आदरांजली अर्पण करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. लहान-मोठे कार्यक्रम आणि विविध बैठकांसाठी सतत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे पालकमंत्रीही आज सेवाग्राम आश्रमात दिसले नाहीत. इतकेच नाही तर जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी ही सेवाग्राम आश्रमाकडे फिरकले नाही. आश्रमात पहाटे रामधुनीपासून सुरू झालेल्या कार्यक्रमाची सायंकाळी सामूहिक प्रार्थनेनंतर सांगता करण्यात आली. पण, या कालावधीत काँग्रेसचे कोणतेही नेते आले नाहीत. त्यामुळे ‘काँग्रेसकडून गांधींचा  राजकारणासाठीच वापर होतो’ असा विरोधकांचा रोख आणखीच भक्कम झाला. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनाेज चांदुरकर यांना विचारले असता पदाधिकाऱ्यांसह आश्रमात होतो, असे सांगितले.

भाजपच्या मंडळींची होती उपस्थिती...-   राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केल्याने त्यांच्यामुळे का होईना  खासदार रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह इतरही भाजपाचे पदाधिकारी आश्रमात उपस्थित झाले होते. त्यांनी बापूकुटीत आदरांजलीही वाहिली. तसेच माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे यांनीही आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेस