आरोग्य सेवा कोलमडली

By Admin | Updated: June 4, 2014 23:56 IST2014-06-04T23:56:51+5:302014-06-04T23:56:51+5:30

जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा खेळंबा झाला आहे. या संपात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य

Health service collapses | आरोग्य सेवा कोलमडली

आरोग्य सेवा कोलमडली

वर्धा :  जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा खेळंबा झाला आहे. या संपात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश असल्याने रुग्णांचे हाल होत आहे.
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ ‘मॅग्मो’ संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी यासाठी २ जूनपासून बेमूदत संप पुकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आश्‍वासन देऊनही मागण्यांची पूर्तता केली नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी संपाचे हत्यार उपसल्याचे संघटनेचे अधिकारी सांगत आहेत.
सन २00९-१0 मध्ये समावेशन झालेल्यांना पूर्ववक्षी प्रभावाने लाभ मिळावा, अस्थाई ७८९ बीएएमस वैद्यकीय अधिकारी व ३२ बीडीएम दंत तज्ज्ञाना कायम करावे १ जानेवारी २00६ पासून वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन अयोग लागू करावा. राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना केंद्र शासनाप्रमाणे व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळावे, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकार्‍यांना खातेअंतर्गत पदोन्नतीचा मार्ग द्यावा, वैद्यकीय अधिकार्‍यांची ज्येष्ठता यादी तयार करावी, कामाचे तास निश्‍चित करावे. व्यवसायरोध भत्ता ऐच्छीक असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमास असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना व्यवसायरोध भत्ता मिळावा, वैद्यकीय अधिकार्‍यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठविण्याकरिता आदर्श धोरण ठरविण्यात यावे, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना तीन व सहा आगावू वेतनवाढी देण्यात याव्या व सेवानवृत्तीचे वय ६२ करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यासाठी वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही आश्‍वासनाशिवाय संघटनेच्या पदरी काहीही पडले नसल्याचे नाईलाजास्तव संप करावा लागल्याचे संघटनेने सांगितले आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता शासनाच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.  ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.(प्रतिनिधी)
 

Web Title: Health service collapses