शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून युवकांना मार्गदर्शन

By admin | Updated: November 5, 2016 01:03 IST

सद्धम्म प्रचार केंद्राचे १६६ वे धम्म प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबिराचा गुरूकृपा कॉलनी, जुनापाणी चौक येथे प्रारंभ झाला.

सद्धम्म प्रचार केंद्राचा उपक्रमवर्धा : सद्धम्म प्रचार केंद्राचे १६६ वे धम्म प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबिराचा गुरूकृपा कॉलनी, जुनापाणी चौक येथे प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन इंजि. विजय नाखले यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य बी.सी. वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हनून प्रा. नुतन माळवी, धनंजय नाखले, मधुकर सवाळे, गुलाब नेवारे, सुधीर वानखेडे उपस्थित होते. यावेळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी बोलताना विजय नाखले म्हणाले, बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. तर आचार्य बी.सी. वानखेडे यांनी बुद्ध तत्वज्ञान हे मानवी जीवनाच्या उद्धारासाठी कसे महत्वाचे आहे हे विविध उदाहरणासह पटवून दिले. यानंतर बोलताना नूतन माळवी यांनी पंचशीलातील तत्व सांगितले. पंचशीलाने मानवाचे जीवन कसे मंगल होते ते सांगितले. याप्रसंगी भारतीय राज्यघटना स्वअक्षरात लिहणारे व लिम्का बुकमध्ये नोंद झालेले धनंजय नाखले यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू थुल यांनी केले. संचालन धम्मसेवक प्रणोज बनकर तर आभार सुनील ढाले यांनी मानले. शिबिराला धम्मसेवक प्रणोज बनकर, दीक्षा मेश्राम, रोशन इंगोले, वनिता मेश्राम, भीमराव गाडगे, शीला डोके, शालिनी हाडेकर, प्रभाकर मगर, लांडगे, गवळी, रत्नमाला बनकर यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)