शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांच्या ग्रामसभा उपस्थिती भत्त्यात वाढ

By admin | Updated: November 19, 2014 22:46 IST

पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात.

तळेगाव (श्या़पं़) : पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामसभेला उपस्थित भत्यात घसघशीत वाढ केली आहे. शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्याला २०० रूपये भत्ता दिला जाणार आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत विकासाचा केंद्र बिंदू आहे. गावाचा विकासाचे नियोजन गावातच व्हावे यासाठी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आले आहे. ग्रामसभेत बहुमताने ठरविलेली कामे केली जातात मात्र बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा म्हणजे केवळ सोपस्कार झाला आहे. गावकरीही उपस्थित राहत नाही. परिणामी शासनाच्या उद्देशाला तडा जातो. काही मोजकीच मंडळी गावाच्या विकासाचा निर्णय घेतात. हा प्रकार टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेत सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरूवातीला नाममात्र २५ रूपये भत्ता दिला जाता होता. त्यामुळे अनेक सदस्य मासिक सभेला पाठ फिरवित होते. आपल्या मानधनात वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मान्य करीत आता या मागणीत घसघशीत आठ पट वाढ झाली आहे. नव्या नियमानुसार मासिक सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना २०० रूपये मानधन दिले जाणार आहे. यात ७५ टक्के वाटा शासनाचा तर २५ टक्के वाटा ग्रामपंचायातीला उचलावा लागणार आहे. यासोबतच सरपंच व उपसरपंचांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ झाली आहे. ही वाढ गावच्या लोकसंख्येवर आधारित राहणार आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला एक हजार रूपये दोन ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड हजार रूपये, तर आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात दोन हजार रूपये मानधन मिळणार आहे. यातील ७५ टक्के वाटा हा शासन उचलणार आहे. वर्षभरात कितीही सभा झाला तरी उपस्थित भत्ता केवळ १२ सभासाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य १२ ही सभांना उपस्थित राहिल्यास त्याला वर्षभरांचे २४०० रूपये मिळणार आहे. ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामसभांच्या बळकटी करण्यासाठी शासनाने हे पाऊस उचलले आहे. आता ग्रामसभांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. अशी अपेक्षा आहे. यातून गावाचा निश्चित विकास होणार असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे.(वार्ताहर)