शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने पूरग्रस्तांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे

By admin | Updated: September 3, 2015 01:49 IST

शासनाने पूरग्रस्तांना दिलेल्या भूखंडाचे कायमस्वरूपी पट्टे देण्याचा तसेच नगर भूमापन करून आखीव पत्रिका पुरविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाला दिला होता.

मागणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला भूमिअभिलेख कार्यालयाकडून केराची टोपलीहिंगणघाट : शासनाने पूरग्रस्तांना दिलेल्या भूखंडाचे कायमस्वरूपी पट्टे देण्याचा तसेच नगर भूमापन करून आखीव पत्रिका पुरविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाला दिला होता. या आदेशाला आठ महिन्यांचा काळ लोटूनही भूमी अभिलेख कार्यालयाने कोणतीही कारवाई केलेली नाही. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचे आक्षेप किसान अधिकार अभियानने उपविभागीय अधिकारी भुगावकर यांना सादर केलेल्या निवेदनातून घेतला आहे. ३० दिवसात आखीव पत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. शहरातील पूरपीडित नागरिकांना १९७९ मध्ये भूखंड वाटप करण्यात आले होते, परंतु त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात न आल्याने त्यांना कायदेशीर हक्क मिळाला नाही. किसान अधिकार अभियानचे तालुकाध्यक्ष प्रवीण उपासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यावर ८ जानेवारी २०१५ ला जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांना नगर भूमापन करून आखीव पत्रिका पुरपीडितांना पुरविण्याचा एक आदेश पारित केला होता. या आदेशात कारवाई संदर्भात पुरग्रस्तांची एक बैठक बोलावून या भूखंड वाटपाच्या वेळी शासनाने वाटप केलेले करारनामे जमा करून एक महिन्याच्या आता रेकॉर्ड तयार करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर पूरपीडित नागरिक कार्यवाहीची आशा बाळगून होते. मात्र संबंधित विभागाने आठ महिन्यांचा काळ लोटूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. पूरग्रस्तांजवळ आपल्या भूखंडाचे कोणतेही शासकीय कागदपत्रे नसल्याने त्यांना महत्वाच्या कामाकरिता या जागेची विक्री व गहाणपत्रे करता येत नाही. मुला-मुलींच्या शिक्षणाकरिता, कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणात या भूखंडावर पैसे मिळू शकत नाही. सदर भूखंडाच्या मालकीबाबत कोणताही कायदेशीर पुरावा नसल्याने पूरग्रस्त आर्थीक अडचणीत सापडले आहे. याबाबत शासकीय यंत्रणेला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला भूमी अभिलेख कार्यालयाने केराची टोपली दाखविली, असा आरोप निवेदनातून केला आहे. शिष्टमंडळात किसान अधिकार अभियानचे तालुकाध्यक्ष प्रवीण उपासे, प्रमोद गोहाणे, धनंजय बकाणे, किशोर भोयर, शेख रमजान, प्रवीण कोल्हे, मनोहर ब्राह्मणवाडे, कृष्णा पोगले, सिकंदर आमगे, संदीप आमगे, अमोल बाणाइत, वारीस उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)