शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़ शाळेत विद्यार्थ्यांमागे मासिक १० हजार खर्च

By admin | Updated: December 6, 2014 22:53 IST

नेहमी चर्चेत राहणाऱ्या जि़प़ शिक्षण विभागाची डोळेझाक तालुक्यातील हिरडी (व़) शाळेकडे पाहिल्यास पुन्हा समोर येते़ केवळ नऊ विद्यार्थ्यांकरिता तीन कर्मचारी आहे़ त्यांच्या वेतनाचा हिशेब केल्यास

सुधीर खडसे - समुद्रपूर
नेहमी चर्चेत राहणाऱ्या जि़प़ शिक्षण विभागाची डोळेझाक तालुक्यातील हिरडी (व़) शाळेकडे पाहिल्यास पुन्हा समोर येते़ केवळ नऊ विद्यार्थ्यांकरिता तीन कर्मचारी आहे़ त्यांच्या वेतनाचा हिशेब केल्यास एका विद्यार्थ्यासाठी शासनाचा मासिक १० हजार रुपये खर्च होताना दिसतो़ हा खर्च कुणाच्या हितासाठी होतो, हा प्रश्नच आहे़
दोन महिन्यांपूर्वी आरटीई निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था तालुक्यातील जिथे शिक्षक संख्या कमी आहे, अशा शाळांत करायची होती़ त्यानुसार काही शिक्षकांचे समायोजन केले़ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा प्रामाणिक उद्देश यामागे सांगण्यात आला; पण काही हितसंबंधातील शिक्षकांना अत्यंत कमी पटसंख्या असताना खासगी सोयीच्या हिताच्या सुलभ शाळेत ठेवण्यात आले़ तालुक्यातील हिरडी प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या नऊ असून अध्यानासाठी तीन शिक्षक कर्मचारी आहे़ शिक्षक वेतनाचा ताळमेळ जुळविला असता तीन कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन ९० हजार होते़ नऊ विद्यार्थ्यांमागे मासिक हिशेब ग्राह्य धरला तर एका विद्यार्थ्यामागे १० हजार रुपये प्रती महिना शासनाचा खर्च होतो़ एकंदर विचार करता वेतनरूपात शासनाचा खर्च होत असलेला खर्च विद्यार्थी हितासाठी की केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ तीन महिन्यांपासून हिरडी (व़) शाळेत ही व्यवस्था पाहावयास मिळते़
कर्तव्यात कसूर केल्याच्या सबबीखाली जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्ह्यातील तीन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली़ मग, शासन नियम, शिक्षणहित व्यवस्थापनाच्या रास्त नियमांना तिलांजली देणाऱ्या तालुक्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर जि़प़ प्रशासन कोणती कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ केवळ नऊ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्यात ९० हजार वा त्यापेक्षा अधिक खर्च होत असल्याने वरिष्ठांनी याकडेही लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़