शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनकामगारांचे आमरण उपोषण

By admin | Updated: August 9, 2015 02:12 IST

वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले.

अचानक कामावरून केले कमी : दोन दिवसानंतरही प्रशासन सुस्तआष्टी : वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात एका कर्मचाऱ्याने आमरण तर चौघांनी साखळी उपोषण वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे. दोन दिवस लोटूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या सेवा जेष्ठता यादीमध्ये २२ वनकामगार कार्यरत होते. यापैकी आष्टी तालुक्यातील ४ कर्मचारी कार्यरत होते. वनविभागाने ३ जून १९९१ साली मोई येथील बाला पवार यांना आॅर्डर दिली. त्यांना सेवाजेष्ठता यादीप्रमाणे नियमीत केले नाही. सेवानिवृत्तीचे वय संपले असल्यावरून कामावरून कमी करण्यात येत असल्याचे पत्र देऊन वनविभाग मोकळा झाला. याविरोधात पवार यांनी उपवनसंरक्षक वर्धा यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र ह्याचा काहीच फायदा झाला नाही. शिवाय विशाल खोडे, गुलाब केवटे, दिलीप मडावी, प्रितम वानखडे या चारही कर्मचाऱ्यांवरदेखील अन्याय झाला आहे. याविरोधात ७ आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. याकडे वनविभागाचे अधिकारी अद्याप फिरकले नाही. वनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, वनविभागात कामे असूनही अधिकाऱ्यांनी कामे दिली नाही. त्यामुळे वनकर्मचारी अरूण उईके, उमरी सावरकर, संगीता कुचकार, आदिनाथ मानकर, अशोक वानखडे आष्टी, जनार्दन पाटील, सरस्वता कानोडे, शेवंता परतेकी या कर्मचाऱ्यांना मृत्यू ओढवला. त्यांना कोणतीही मदत दिली नाही. यासह अनेक मागण्या शासनदरबारी पडून आहे. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नाही. उपोषण मंडपात बसलेले बाला पवार यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावर प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. आष्टी वनपरिक्षेत्राप्रमाणेच जिल्ह्याची स्थिती आहे.सामाजिक वनीकरण कार्यालयानेही असाच प्रकार केला आहे. वनकर्मचारी यांना कामे दिल्या जात नाही. कुटूंब कसे पोसावे असा प्रश्न मजुरांसमोर आहे.(प्रतिनिधी)एकाची प्रकृती खालावलीवनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नसल्याची ओरड होत आहे.