शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

साडेअकरा लाख मतदार निवडणार चार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून १ हजार ७०१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देचार विधानसभा : शांततेत मतदानासाठी प्रशासनाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार आहेत. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.हे अर्ज त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय कार्यालयात स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस यंत्रणा व प्रशासन सज्ज झाले आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून १ हजार ७०१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ४ डीवासयएसपी, १८ पोलिस निरीक्षक, १०६ पोलिस पोलिस उपनिरीक्षक एसआरपीएफ, सीएपीएफची तुकडीही राहील.१५ चेकपोस्ट लागणारनिवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देण्याकरिता रोख रक्कम, दारूसाठा व अन्य वस्तूंची वाहतूक होते. यावर पोलिस विभागासोबतच निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. जिल्ह्यात याकरिता १५ चेकपोस्ट असणार आहेत.तृतीयपंथीही बजावणार मतदानाचा हक्कजिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथीयांची संख्या एकूण १४ आहेत. एकट्या वर्धा मतदारसंघात १२ तृतीयपंथी आहेत. तर देवळी विधानसभा मतदारसंघात दोन आहेत. ही मंडळीची मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019