शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

लोअर वर्धा धरणाचा ३० शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

आर्वी तालुक्यात असलेले सर्वच धरण यावर्षी हाऊसफुल्ल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कोरडे असणारे धरण भरल्याने शेतकरी आनंदी आहे. या पाण्याचा रब्बी हंगामासाठी उपयोग होणार असला तरी लोअर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे तीन गावातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

ठळक मुद्देतीन गावातील शेतकरी चिंतेत : १०० एकर शेती प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील लोअर वर्धा हे धरण या वर्षी १०० टक्के भरल्याने देऊरवाडा, इठलापूर व राजापूर गावातील शेतकऱ्यांची सुमारे १०० एकर शेती धरणाच्या वाढलेल्या पाणीपातळीने पडीत राहण्याची वेळ आली आहे. परिसरातील देऊरवाडा, इठलापूर व राजापूर या तीनही गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही देऊरवाडा मौजात येते त्याना शेतीच्या वहीवाटीसाठी इठलापूर पांधन रस्ता उपलब्ध होता पण धरण पूर्ण भरल्याने आलेल्या बँकवाटरमुळे या शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मार्ग उरलेला नाही . त्यामुळे आतापर्यंत उभे केलेले पीक पडीक पडते की काय अशी भीती या शेतकऱ्यांना वाटत आहे. या रस्त्यावर खराडीचा नाला येत असून या नाल्यात धरणाचे बॅकवॉटर आल्याने तेथून काही शेतकरी जीव मुठीत घेवून शेताचा रस्ता ओलांडताना दिसून येतात. या भागात बॅक वाटर राहण्याची शक्यता असल्यामुळे या शेतकऱ्यांनी पर्यायी रस्त्याची मागणी ही प्रशासनाकडे केली होती पण प्रशासनाने यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांची जमीन पडीक राहिल्यास त्याच्यांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग लोअर वर्धा धरण यंत्रणेने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून द्यावी ही मागणी बाधीत शेतकºयांकडून होत आहे. यंदा आर्वी तालुक्यातील अनेक धरण भरले आहेत.धरण हाऊसफुल्लआर्वी तालुक्यात असलेले सर्वच धरण यावर्षी हाऊसफुल्ल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कोरडे असणारे धरण भरल्याने शेतकरी आनंदी आहे. या पाण्याचा रब्बी हंगामासाठी उपयोग होणार असला तरी लोअर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे तीन गावातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. यावर उपाययोजना न झाल्यास शेतकºयांना शेती सोडावी लागेल.माझी लोअर वर्धा धरणात ७ एकर शेती गेल्यामुळे माझी परिस्थिती ही फार हलाखीची आहे,माझ्याकडे फार थोडी शेती शिल्लक आहे. आणि आता त्या शेतीच्या वहिवाटीसाठी ही रस्ता नसल्याने ती शेती कशी कसावी असा प्रश्न मला व माझ्या कुटुंबाला पडलेला आहे. आमच्या उदरनिवार्हाचे साधन हे उर्वरित शेती हेच आहे. त्यामुळे शेतकºयांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा उर्वरित शेती ही शासनाने अधिग्रहित करून त्याचा मोबदला द्यावा.- अरविंद दे. कदम, धरणग्रस्त व रस्ताबाधीत शेतकरी.

टॅग्स :Damधरणfloodपूर