शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

डीपीडीसीच्या बैठकीत आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येणार

By admin | Updated: January 29, 2015 23:11 IST

जिल्ह्याचे नवे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हा नियोजन समितीतील विकास कामांचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत. योगायोग असा की यापूर्वीचे पालकमंत्री रणजित कांबळे हे सुद्धा या सभेला आमदार

राजेश भोजेकर - वर्धाजिल्ह्याचे नवे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हा नियोजन समितीतील विकास कामांचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत. योगायोग असा की यापूर्वीचे पालकमंत्री रणजित कांबळे हे सुद्धा या सभेला आमदार व समितीचे सदस्य या नात्याने हजर राहतील. त्यांच्या समक्ष त्यांनी यापूर्वी मंजूर केलेल्या विकास कामांना बगल देण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, वर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक सेवाग्राम आश्रम लगतच्या यात्री निवासात होऊ घातली आहे. यामुळे या बैठकीला ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभणार आहे. रणजित कांबळे यांनी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अनेक विकास कामांना मंजुरी दिलेली आहे. वास्तविक, त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आली. त्यानंतर अल्पावधीतच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. यामुळे मंजूर विकास कामांना प्रत्यक्ष साकार करण्याचा अवधी जिल्हा प्रशासनाला मिळालाच नाही. यामुळे मंजुर झालेली अनेक कामे ही कागदावरच असल्याची माहिती आहे. यानंतर राज्यात भाजपचे सरकार सत्तारुढ झाले. नवा गडी नवा डाव, या उक्तीनुसार नवे पालकमंत्री आणि त्यातच भाजपचे नवे आमदार आपल्या मर्जीतील कामांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप आमदारांकडून दबाब वाढत असल्याची माहिती आहे.पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा ना. सुधीर मुनगंटीवार हे वर्धेत आले होते. तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा धावता आढावा घेतला होता. यावेळीच जिल्हा प्रशासनाला काही नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. यावरुन शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नवे विषय पटलावर येण्याची दाट शक्यता आहे. यातच जे जुने विषय अद्यापही कागदावरच आहे त्या विषयांना बगल दिली जाण्याचीही दाट शक्यता आहे. असे झाल्यास रणजित कांबळे हे स्वत: हजर राहणार असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही जनतेचे लक्ष लागलेले आहे.