शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर ६ ते ८ मार्च असे तीनदिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठही पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधून ७५२ मुले आणि १ हजार ४० मुली सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा निष्काळजीपणा : क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. मात्र, कॅटरर्स व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे या महोत्सवाला सरतेशेवटी गालबोट लागले. कॅटरर्स व्यावसायिकाडून परिसरातच फेकण्यात आलेले उरलेले उन्न व प्लास्टिकयुक्त कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला. परिणामी, रहिवासी नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर ६ ते ८ मार्च असे तीनदिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठही पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधून ७५२ मुले आणि १ हजार ४० मुली सहभागी झाल्या होत्या. तीन दिवसांच्या कालावधीत विविध ३० स्पर्धा घेण्यात आल्या. तीन दिवसीय या महोत्सवाकरिता अन्नपुरवठ्याचे कंत्राट नागपूर येथील विजय दहीकर यांच्या कॅटरर्सला देण्यात आले होते. या व्यावसायिकाने पुरविलेल्या अन्नाची गुणवत्ता हवी तशी नव्हती, असा आरोपही आयोजकांनी केला. कंत्राटदाराला दिलेल्या अन्नपुरवठा आदेशात स्वच्छता करण्याची बाब अंतर्भूत होती. असे असताना या कॅटरर्स व्यावसायिकाने कमालीचा हलगर्जीपणा केला. उरलेल्या अन्नाची व्यवस्थित विल्हेवाट न लावता बेशिस्तीचे दर्शन घडविले. शिळ्या अन्नासह पोती जुन्या तहसील कार्यालय परिसरात फेकून देण्यात आली.संकुलातील नालीतही प्लास्टिक व इतर कचºयाचा खच पडलेला होता. व्यावसायिकाला उरलेल्या अन्नाची नीट विल्हेवाट लावण्यासह स्वच्छता करण्याचा विसर पडला. त्यामुळे सोमवारची पहाट उजाडताच वातावरण दुर्गंधीमय झाले होते. या शिळ्या अन्नावर जनावरे उच्छाद घालत असल्याचे दिसून आले. नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागला.कंत्राटदाराला दिलेल्या अन्नपुरवठा आदेशात गुणवत्तापूर्ण अन्नपुरवठ्यासोबतच स्वच्छतेची बाब समाविष्ट होती. मात्र, या कंत्राटदाराने उरलेले अन्न परिसरातच फेकून दिले. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- सुरेश हजारे, शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. वर्धा.परिसराच्या स्वच्छतेकरिता क्रीडा संकुलातील चौकीदाराला पैसे दिले होते. त्याने स्वच्छता केली नसावी.- विजय दहीकर, कॅटरर्स व्यावसायिक, नागपूर.

 

टॅग्स :Socialसामाजिक