लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीचे आमिष दाखवत गेल्या पाच वर्षांपासून पीडितेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्याविरुद्ध पीडितेने पुलगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे (७८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी पुलगाव पोलिसांनी केली.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी २०२२ मध्ये अवघ्या १७ वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत गेल्या सुमारे पाच वर्षापासून तिचे सातत्याने शरीरसुखाची मागणी केली होती.
अशातच तीन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवून छळ केला. यामुळे त्रस्त पीडित मुलीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत शनिवारी सायंकाळी दिवाकर गमे यांना अटक केली. पोलिसांनी गमे यांचा मोबाइलही जप्त केला असून, त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपीचा अजित पवार गटाशी संबंध
आरोपी गमे हे राष्ट्रवादी (अजित पवार शी संबंधित एका दिग्गज नेत्याचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राहिले आहेत. ते २०२२-२३ या काळात महाज्योतीचे संचालक होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संशयित आरोपी हा मागील काही दिवसांपासून मुलीला व्हॉट्सअॅपवर अभद्र मेसेज करत होता. यामुळे पीडिता त्रस्त झाली होती. या त्रासाला कंटाळून तिने पुलगाव पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Web Summary : Ex-Mahajyoti director Diwakar Game arrested for demanding sexual favors from a minor under job pretense for five years. He also sent obscene photos/videos. Police seized his phone, revealing more evidence. Game has political ties with NCP's Ajit Pawar faction.
Web Summary : पूर्व महाज्योति निदेशक दिवाकर गमे को नौकरी का लालच देकर पांच साल से नाबालिग से यौन संबंध मांगने के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने अश्लील तस्वीरें/वीडियो भी भेजे। पुलिस ने उसका फोन जब्त कर लिया, जिससे और सबूत मिले। गमे के राकांपा के अजित पवार गुट से राजनीतिक संबंध हैं।