शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केले अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:43 IST2019-07-05T23:42:36+5:302019-07-05T23:43:18+5:30
सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केले अन्नत्याग
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आंदोलनस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रक्तदानही केले. तसेच शेतकºयांना तत्काळ पीकविम्याचा लाभ मिळावा, दुबार पेरणी करणाºयांना आर्थिक मदत द्यावी, मिश्र खतांच्या वाढलेल्या किमती व त्यामध्ये होणारी लूट थांबवावी, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा यासह बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांमुळे शेतकºयांवर होणारे हल्ले कमी करण्यासाठी उपाय योजना करून शेतकºयांना वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशा असंख्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
निवेदन देताना प्रहारचे जिल्हाप्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, अरूणा सावरकर, विवेक ठाकरे, रिना श्रीखंदकर, आमोद क्षीरसागर, शैलेश सहारे, सुमेध उमक, गौरव काळमेघ, संजय मेश्राम, महेश साहू व आदित्य कोकडवार यांची उपस्थिती होती.