शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2015 02:18 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रती व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ ...

पवनार येथे कार्यक्रम : जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ शेतकऱ्यांना लाभवर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रती व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ पवनार येथे शनिवारी झाला. मातोश्री बहुउद्देशिय सहकारी स्वसत धान्य दुकानातून पवनार येथील शेतकरी श्यामराव इखार यांना सवलतीच्या दरातील गहू दोन रुपये व तांदूळ तीन रुपये किलो दराने देण्यात आले. या योजनेच्या पहिल्या लाभार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.पवनार येथील मातोश्री बहुउद्देशिय सहकारी स्वस्त धान्य दुकानाच्या परिसरात आयोजित शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरणाच्या योजनेचा शुभारंभ खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सरपंच राजेश्वर गांडोळे, उपसरपंच जगदीश पेटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांच्या उपस्थितीत झाला.केशरी, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर ही योजना असून जिह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तालुका व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध आहेत. या योजनेच्या लाभापासून जे शेतकरी अद्याप वंचित आहेत त्यांनी तत्काळ आपली नावे संबंधीत तहसीलदारांकडे द्यावीत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. या योजनेपासून कुणीही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.खासदार तडस म्हणाले की, शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी शेतीबरोबरच जोडधंदा करावा. शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना राबवित आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच पर्यटन विकासासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून पवनार व सेवाग्रामचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार डॉ. भोयर यांनी सततची नापिकी, अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रति व्यक्ती गहू व तांदुळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व प्रत्येक गावापर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सरंक्षित सिंचन व विजेचा प्रश्नही सोडविण्यात आला आहे. पवनार येथील विकासासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी लाभार्थी शेतकरी दिवाकर बोकडे, शंकर साटोने, अंबादास वाटमोडे, शंकर हिंगणकर, बापूराव बोरकर, विनोद बोरकर, कवडूजी बालपांडे यांना सवलतीच्या दरात गहू व तांदुळ वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)