शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील खाद्यपदार्थ ठरताहेत धोकादाायक

By admin | Updated: September 13, 2014 02:09 IST

उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी वर्धा शहरात मात्र सर्वत्र उघड्यावर अन्न पदार्थांची जोरात विक्री केली जात आहे़

वर्धा : उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी वर्धा शहरात मात्र सर्वत्र उघड्यावर अन्न पदार्थांची जोरात विक्री केली जात आहे़ पावसाळा जोरात सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर उघड्यावर होणारी खाद्य पदार्थांची विक्री नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे़ असे असले अन्न व औषध प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. खाद्य पदार्थाची विकी करताना अनेक नियम पाळावे लागतात़ ज्या ठिकाणी स्टॉल आहे तेथे सांडपाणी वाहून नेणारी नाली नसावी अथवा एखाद्या गटाराच्या काठावर स्टॉल लावू नये, असा नियम आहे़ मात्र शहरातील अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी या नियमाला बगल दिली आहे़ अनेक स्टॉल घाणीच्या जवळपासच असल्याचे दिसते. ज्या दुकानातून खाद्य पदार्थांची विक्री केली जाते, त्या दुकानात स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे़ मात्र शहरातील काही हॉटेल्सना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता, काही ठराविक हॉटेलमध्येच ही स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले़ खाद्य पदार्थावर जाळीसारखे आवरण झाकले पाहिजे, असाही नियम आहे़ परंतु बसस्थानक, कचेरी परिसर तसेच इतरही मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमध्ये खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात़ रस्त्यावरून वाहनांचे आवागमन सुरू राहत असल्याने या पदार्थावर मोठ्या प्रमाणावर धूळ बसते़ त्यामुळे हे पदार्थ दुषित होतात़ त्यापासून आरोग्याला बाधा पोहचते़ असे असतानाही धुळीने माखलेले खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहे़ याविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाने काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. पावसाळा जोरदार सुरू आहे. अशावेळी असे उघड्यावरील पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. बाहेरील पदार्थ थोडेफार स्वस्त मिळत असल्याने नागरिक असे पदार्थ खाण्यावर जास्त भर देतात. कचेरी आणि बसस्थानक परिसरात हा प्रकार जास्त दिसतो. उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार बळावू शकतात़ रस्त्यालगत अन्नपदार्थ विकणारेही आपल्या पोटासाठीच व्यवसाय करीत असतात. परंतु योग्य काळजीअभावी ते इतरांचे पोट खराब करीत आहे. असे पदार्थ विकताना ते स्वच्छ असावे आणि ते झाकले असने गरजेचे आहे. याकडे अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)