शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

By admin | Updated: September 24, 2016 02:15 IST

दरोड्याच्या उद्देशाने शस्त्र व इतर साहित्य घेवून लपून बसून असलेल्या पाच जणांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोरटा मार्गावरील घटना : मिर्ची पावडरसह शस्त्र जप्त वर्धा : दरोड्याच्या उद्देशाने शस्त्र व इतर साहित्य घेवून लपून बसून असलेल्या पाच जणांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाच जणांकडून लाठी, लोखंडी रॉड, तलवार, दोरी व मिरची पवडरच्या दोन पुड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई गुरुवारी रात्री पुलगाव ते आर्वी मार्गावरील सोरटा फाट्याजवळील बसथांबा परिसरात करण्यात आली. योगेश उर्फ काल्या राहुल गणविर (२५) दिनेश केशव कावनकुरे (३७) दोन्ही रा.नागपूर फैल, विजय अरविंद वाघधरे (२६) रा. तारफैल, रितेश बजरंगसिंग ठाकूर (२०) व राजेश उर्फ बाबू गणेश गुप्ता (२१) दोन्ही रा हरिराम नगर, पुलगाव अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर सूमित इंगळे रा. पुलगाव हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सुत्रानुसार, सोरटा फाट्याजवळ असलेल्या बसस्थांब्याजवळ काही युवक अंधारात लुटमार किंवा दरोड्याच्या उद्देशाने लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ठाणेदार मुरलीधर बुराडे, उपनिरीक्षक राजूरकर, हवालदार प्रकाश लसूंते, रवींद्र मूजबैले, विवेकानंद धनुले, संजय रिठे, किशोर लभाने, भारत पिसूड्डे, सागर गिरी, अमोल आत्राम, क्रिष्णा कासदेकर, संतोष दरवरे, पवन निलेकर, विकास मुडे यांनी घटनास्थळ गाठले. सोरटा फाटा येथे पोहचून बसथांब्याला घेराव घातला असता तिथे हजर असलेले युवक पोलीस वाहन पाहून पळू लागले. पाठलाग करून पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात योगेश गणविर, विजय वाघधरे, दिनेश कावनकुरे, रितेश ठाकूर व राजेश गुप्ता यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक तलवार, दोन लोखंडी रॉड, एक लाकडी दांडा, १५ फुट नायलन दोर, दोन मिर्ची पावडरच्या पुड्या असे साहित्य मिळून आले. यावरून त्यांच्यावर पुलगाव पोलिसात भादंविच्या कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.(प्रतिनिधी)