शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जात पाच बँकांची माघारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2015 02:50 IST

चार वर्षांपासून सुरू असलेली दुष्काळी स्थिती लक्षात घेत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार देणे गरजेचे होते.

जिल्ह्याने गाठले ९४ टक्के उद्दिष्ट : सहा बँकांनी ‘क्रॉस’ केले ‘टार्गेट’वर्धा : चार वर्षांपासून सुरू असलेली दुष्काळी स्थिती लक्षात घेत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार देणे गरजेचे होते. यामुळेच शासनाच्या आदेशावरून बँकांनी १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न चालविले आहेत. प्रारंभी रखडलेली पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया मध्यंतरी वेगात पुढे सरकली. यामुळे पीक कर्ज वाटपामध्ये जिल्ह्याला ३१ आॅगस्टपर्यंत ९४ टक्के उद्दीष्ट गाठता आले आहे. यात सहा बँकांनी उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्ज दिले तर पाच बँकांना ६० टक्केही कर्ज वाटप करता आलेले नाही.गतवर्षी कोरडा दुष्काळ व त्यापूर्वी अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. २०१३-१४ मध्ये दुष्काळ जाहीर झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे व्याज माफ करून कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; पण एक लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना जटील प्रक्रियांचा सामना करावा लागला. यानंतर बँकांना प्रत्येक शेतकऱ्याला कर्जाचा पुरवठा झालाच पाहिजे, असे निर्देश देण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी व अग्रणी बँकेने सर्व बँकांना सूचना देत कर्ज पुरवठ्याचा पाठपुरावा केला. ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला ९४ टक्के कर्ज वाटपाचे उद्दीष्ट गाठता आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ५६ हजार १०९ शेतकऱ्यांना ५०८ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. खरीप व रबी हंगामातील एकूण कर्जदार शेतकरी ६० हजार ५०९ आहे. उर्वरित सहा टक्के शेतकऱ्यांनाही येत्या काही दिवसांत कर्ज पुरवठा करून १०० टक्के उद्दीष्ट गाठण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, अलाहाबाद बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, कार्पोरेशन बँक आणि आयसीआयसीआय या सहा बँकांनी कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दीष्ट गाठले आहे. शिवाय अतिरिक्त शेतकऱ्यांनाही कर्ज वितरित केले आहे. असे असले तरी सहा बँकांना कर्ज वाटपाचे ६० टक्केही उद्दीष्ट गाठता आलेले नाही. यात स्टेट बँक आॅफ हैद्राबाद १२.८४ टक्के, आंध्रा बँक २०.४७ टक्के, अ‍ॅक्सीस बँक ३६.८६ टक्के, सिंडीकेट बँक ३८.५२ टक्के तर बँक आॅफ बडोदाने ५४.५१ टक्के यांचा समावेश आहे. या बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्याला कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दीष्ट गाठताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून मुदतवाढ देण्यात आली; पण बँका कर्ज गंभीर नसल्याचे दिसते. ६० टक्केच्या आत कर्ज वाटप असलेल्या बँकांना प्रशासनाने वठणीवर आणणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)पुनर्गठण व नूतनीकरण प्रक्रियाही सुरूचगतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश शासनाने दिले. यावरून जिल्ह्यातील १० हजार ७६ शेतकऱ्यांच्या १३९ कोटी ९३ लाख रुपये कर्जाचे बँकांकडून पुनर्गठण करण्यात आले. २४ हजार ८९३ खातेदारांना २२७ कोटी २१ लाख रुपयांचे नवीन कर्ज दिले. शिवाय ३१ हजार २१६ शेतकऱ्यांच्या २८१ कोटी २५ लाख रुपयांच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सर्वाधिक व सर्वात कमी कर्ज वाटप जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्ज वाटप बँक आॅफ इंडियाने केले. या बँकेने २१ हजार ११४ शेतकऱ्यांना १५१ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. यातून बँकेचे १०१.३१ टक्के उद्दीष्ट साध्य करण्यात आले. पुनर्गठण व नुतनीकरणातही बँकेचे ९०.५६ टक्के उद्दीष्ट गाठले. सर्वात कमी ५२ शेतकऱ्यांना ४३ लाख ६४ हजार रुपये स्टेट बँक आॅफ हैद्राबादने वितरित केले.