शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकरात उत्खनन, अनधिकृत बांधकाम

By admin | Updated: November 4, 2016 01:43 IST

नागपूर-अमरावती महामार्ग क्रमांक सहा लगतच्या पाच एकरात अकृषक परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन व अनधिकृत बांधकाम सुरू आहे.

तक्रारींकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा : सर्वच परवानग्या असल्याची शेत धारकाची दर्पोक्तीकारंजा (घा.) : नागपूर-अमरावती महामार्ग क्रमांक सहा लगतच्या पाच एकरात अकृषक परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन व अनधिकृत बांधकाम सुरू आहे. याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असून परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली; पण अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.शहरापासून दोन किमी अंतरावर महामार्गालगत अमीर अली जाफर मखानी व चौघे यांचे शेत सर्व्हे क्र. ११० मध्ये १.९८ हेक्टर आर अशी सुमारे पाच एकर जागा आहे. सदर शेताची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. एक महिन्यापासून सर्रास अवैध उत्खनन व बांधकाम सुरू आहे. परवानगी नसताना बांधकाम सुरू असल्याने कारवाई का केली जात नाही, याबाबत नागरिक शंका उपस्थित करीत आहेत. महसूल विभागाच्या परवानगीशिवाय वा सदर शेती परावर्तीत केल्याशिवाय असे औद्योगिक वा रहिवासी बांधकाम करता येत नाही; पण शेतमालकाकडून उद्दामपणे बांधकाम केले जात असल्याचे दिसते. याबाबत संबंधित विभागांकडे चौकशी केली असता सदर बांधकाम अवैध असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले; पण गत दीड महिन्यापासून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याउलट शेतमालक माझ्याकडे सर्वच परवानग्या आहेत, असे सांगत आहे. असे असले तरी याबाबत अकृषक परवानगी नसल्याचे समोर आले आहे. शिवाय महामार्गालगत बांधकाम सुरू असून महामार्ग प्राधिकरणाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याकडे जातीने लक्ष देत अवैध उत्खनन व अनधिकृत बांधकाम प्रकरणी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)