शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

गाव तिथे प्रवासी निवारा योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 16, 2014 23:39 IST

महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली.

दारोडा : महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. परंतु आजघडीला बहुतेक गावातील प्रवासी निवारे अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम गावापासून १ ते २ कि़मी. अंतरावर करण्यात आले. पण मधल्या काही काळात त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंंत दुरवस्था झाली. प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस सहन करीत तासनतास बसची वाट पाहत रहावे लागत आहे.होत असलेल्या असुविधेमुळे गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटत आहे. ही योजना राबवूनही अद्याप काही गावांमध्ये प्रवासी निवाराच नाही. अशा गावांमध्ये महामंडळाची बस थांबण्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबावे हा प्रश्न पडला आहे.राज्यात एस.टी. प्रवासाचे मुख्य साधन आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीते ही योजना राबविली. पण योजनेचे फलित मात्र साध्य झाले नाही. त्यातच ग्रामीण भागात बसेसची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. एक बस गेल्यावर दुसरी बस येण्यासाठी तासंतास वाट पहावी लागते. अनेकदा वाहक व चालक प्रवाशांशी, विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तवणूक करतात. गत काही महिन्यात अशा तक्रारी वाढल्या आहेत. या योजनेचा फज्जाच उडाल्याने याकडे लोक प्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनानेही याची दखल दखल घेवून, गाव तिथे प्रवासी निवारो व्हावे अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)