शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आग

By admin | Updated: October 26, 2014 22:43 IST

येथील सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत महाविद्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली.

आगीचे कारण गुलदस्त्यात : स्टोअर रूममधील शैक्षणिक दस्तऐवज खाकवर्धा : येथील सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत महाविद्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली. आग वाचनालयापर्यंत पोहोचली मात्र यात पुस्तके बचावली तरी महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले. आग लागण्याचे नेमके कारण मात्र कळू शकले नसले तरी दिवाळीच्या फटाक्यांमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.निश्चय बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने महाविद्यालयात कुणीच जात येत नाही. शिवाय महाविद्यालयातील ज्या खोलीत आग लागली त्या खोलीत विजेचा दिवाही नसल्याचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले आहे. येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती असलेले विविध कागदपत्र व महाविद्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे होती. या खोलीतूनच आग पसरली असल्याचे सांगण्यात आले आहे. येथून आग वाचनालयापर्यंत पोहोचली. या आगित वाचनालयातील पुस्तके मात्र बचावलीत. आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना देत पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठत वेळीच आग आटोक्यात आणली. यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तलमले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी या प्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र कशाने आग लागली याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. (प्रतिनिधी)