शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

आगीत संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:24 IST

पूर्व हुडकोतील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली, लाखोंचे नुकसान, सात घरांना बसला फटका 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील पूर्व हुडको भागातील एका घरात गॅससिलिंडरच्या लिकेजमुळे शॉर्टसर्किट होऊन घरांना आग लागली़ यात सात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ सुदैवाने जीवितहानी टळली.   मात्र या घटनेत लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़चाळीसगाव रोडवरील पूर्व हुडको भागातील ईस्माईल गॅरेजच्या बाजुला एका घरात स्वयंपाक सुरु होता़ त्यावेळी बारीक स्वरुपात गॅस लिकेज झाल्याने दुपारी १२ ते सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरात शॉर्टसर्किट झाले़ यातून पडलेल्या ठिणगीमुळे गॅसने भडका घेतल्याने त्यात घर पेटले़ गांभीर्य ओळखून घरातील मंडळी तातडीने घराबाहेर पडली़ परिणामी त्यांचा जीव वाचला़ पाहता पाहता आगीने संपूर्ण घर जळून खाक झाले़ ज्या घरात ही घटना घडली त्याच्यासह दोन्ही बाजूची काही घरे यात भस्मसात झाली़ त्यात फरमान सैय्यद रज्जाक, अमिनाबी दादा सैय्यद, महेमूद सय्यद, यास्मीन खाटीक, सबीनाबी म़ शेख यांच्या घरांसह अन्य घरांचा समावेश आहे़मदतकार्य वेगातआगीच्या या घटनेमुळे परिसरात होत असलेला आरडाओरड ऐकून अनेक जणांनी घटनास्थळ गाठून मदतीसाठी धावले. या आगीमुळे गॅस सिलिंडर फुटले असते तर मोठा अनर्थ झाला असता़ मात्र, याच परिसरातील नवाज शेख गयासुद्दीन या तरुणाने इतरांच्या मदतीने पेटत्या घरातील गॅस सिलिंडर यशस्वीपणे बाहेर काढले़ आगीमुळे संपूर्ण सिलिंडर काळे झाले होते़ ते वेळीच बाहेर काढले नसते तर त्याचाही स्फोट होवून घटनेची तीव्रता अधिकच वाढली असती़ मात्र, सुदैवाने ते टळले. अग्नीशमन बंब दाखलआगीच्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ मात्र, या ठिकाणी वाहन जाण्यासाठीही जागा नसल्याने बंबाला दूर थांबून आगीवर नियंत्रण मिळवावे लागले़ पोलीस पथक तातडीने दाखलआगीच्या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते़ या घटनेची अग्नीउपद्रव म्हणून नोंद करण्यात आली असून अनेक संसार उघड्यावर आले  दरम्यान आगीमुळे कुटूंब उघड्यावर आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे