मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:41 IST2018-08-03T22:40:28+5:302018-08-03T22:41:07+5:30

अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांच्या पुढाकाराने ३० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मृतकाच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अपघातातील वाहनधारकांकडून ही मदत मिळवून देण्यात आली.

 Financial aid to the deceased's family | मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

ठळक मुद्देपरिस्थिती नाजूक : ठाणेदारांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांच्या पुढाकाराने ३० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मृतकाच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अपघातातील वाहनधारकांकडून ही मदत मिळवून देण्यात आली.
स्थानिक केदार ले-आऊट येथील भाजविक्रेता अनिकेत महादेव धनजोडे या युवकाचा ट्रक व कारच्या दुहेरी अपघातात मृत्यू झाला. व्यवसायानिमित्त १५ जुलैच्या सकाळी भाजीपाल्याची हातगाडी घेवून वस्तीत जात असताना हा अपघात झाला. घरातील कमावता मुलगा अचानक गेल्यामुळे धनजोडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. एकीकडे मुलगा गेल्याचे दु:ख तर दुसरीकडे आर्थिक विंवचना अश्या स्थितीत कुटुंबिय असताना याची दखल शेजाऱ्यांनी घेतली. त्यांनी सदर कुटुंबियांची परिस्थती ठाणेदार ठाकुर यांना सांगितली. त्यानंतर ठाकुर यांनी महत्त्वाची भूमिका वजावून या अपघातातील वाहन धारकाला विश्वासात घेत त्याच्याकडून ३० हजारांची आर्थिक मदत मृतक अनिकेतच्या कुटुंबियांना मिळवून दिली. मोहन अग्रवाल यांच्या हस्ते ही रक्कम मृतकाच्या कुटुंबियांना देण्यात आली. यावेळी प्रा. गणेश मालधुरे, मोहन गुजरकर, इमरान राही, रविंद्र कोटंबकार आदी हजर होते.

Web Title:  Financial aid to the deceased's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.