शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

पाडुरंग राऊत हे धाम नदीच्या काठावरील शेतात सोमवारी गेले असता त्यांना नदी पात्रात मृत कोंबड्या तरंगताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे प्रकाश लसुंते, अभय इंगळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांना परिसरात सुमारे ५०० कोंबड्या मृतावस्थेत दिसल्या.

ठळक मुद्देनदीपात्रातील मृत कोंबड्या फेकल्या : पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : परिसरात कुणी नसल्याची संधी साधून धाम नदीच्या पात्रात मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात येताच सोमवारी सेवाग्राम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी खरांगणा येथील शेतकरी पांडुरंग राऊत यांनी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दिली आहे.पाडुरंग राऊत हे धाम नदीच्या काठावरील शेतात सोमवारी गेले असता त्यांना नदी पात्रात मृत कोंबड्या तरंगताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे प्रकाश लसुंते, अभय इंगळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांना परिसरात सुमारे ५०० कोंबड्या मृतावस्थेत दिसल्या. मंगळवारी ग्रामस्थांच्या मदतीने मृत कोंबड्या नदीपात्रातून काढण्यात आल्या. याप्रसंगी प्रतिभा जगताप, राजेंद्र खडसे, धैर्यशील जगताप यांची उपस्थिती होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना जेरबंद करू असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस