शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

लढवय्ये मैदानात, आता प्रचार तोफांचा मारा सुरू

By admin | Updated: October 3, 2014 02:03 IST

छानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत.

राजेश भोजेकर वर्धाछानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. या महासंग्रामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असून प्रचारतोफांचा माराही सुरू झाला आहे. एकेकाळचे मित्रही मैदानात असल्याने कोण कोणाला पटकणी देतो. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अपक्षांचेही बारीकसारीक हल्ले आलेच. यामुळे दिग्गजांचा चांगलाच कस लागणार आहे. कार्यकर्ते प्रचार साहित्य घेऊन सज्ज झाले आहेत. प्रचार वाहनेही क्षेत्रात फिरायला लागली असून निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झालेली आहे. प्रचारात कोण आघाडी घेतो, यावरही बरेच काही अवलंबून असल्यामुळे प्रत्येक उमेदवार त्या दृष्टीने धडपडताना दिसून येत आहे.वर्धेत बहुरंगी चित्रनागरिकांचे लक्ष लागून असलेल्या वर्धा मतदार संघात सर्वाधिक २१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १४ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी दिग्गजांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. युती तुटल्यामुळे या मतदार संघात भाजप पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे. यामुळे मतांचे गणित मांडणे कठिण झाले असले तरी सर्वच राजकीय पक्षांच्या मतांची ताकत बघता कोण बाजी मारणार हे सांगणे अवघड आहेत. देवळीत मतांचे विभाजन दिग्गजांची डोकेदुखीदेवळी मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात १९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने मनसे बाद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे काँग्रेस आणि भाजपपुढे कडवे आव्हान आहे. सर्वाधिक नऊ अपक्ष रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन दिग्गजांचे गणित बिघडवणार, असे सध्याचे चित्र आहे.शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचे आव्हानशिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट मतदार संघात शिवसेनेपुढे मनसेच्या रुपाने कडवे आव्हान आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यातच भाजपा पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात असून गेल्या निवडणुकीत अपक्ष असलेल्या उमेदवाराला तिकीट दिली. अपक्ष असताना चोहोबाजूने सदर उमेदवाराला मते मिळाली होती. आता भाजपचे नाव सदर उमेदवारापुढे लागल्यामुळे अनेक मतदार संभ्रमात पडले आहेत. हा मतदार संघ २००९ मध्ये राष्ट्रवादीने सेनेकडून हिरावून घेतला होता. राष्ट्रवादीही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. आघाडीनंतर काँग्रेस पहिल्यांदाच ही निवडणूक लढत असल्यामुळे येथे निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. पाच अपक्ष उमेदवारही रिंगणात असून ते कोणाचे गणित बिघडवते, याकडे लक्ष लागले आहे.काँग्रेस-भाजपातील सरळ लढतीला अपक्ष व राकाँमुळे नवा रंगआर्वी मतदार संघात काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढतीचा इतिहास आहे. यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन आलेच. यात आठ अपक्ष उमेदवारांनी भर घातली आहे. पंचायत समित्यांमध्ये भाजपची राष्ट्रवादीसोबत गट्टी असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत प्रहार संघटना भाजपसोबत होती. या निवडणुकीत प्रहारने अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील पारंपरिक सरळ लढतीला नवा रंग चढणार आहे.