शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचाऱ्यांचा केंद्राच्या सुविधेसाठी लढा

By admin | Updated: August 12, 2015 02:25 IST

केंद्राच्या योजना राज्याच्या कर्मचाऱ्यांना राबवाव्या लागतात. मात्र त्यांना केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात येत

वर्धा : केंद्राच्या योजना राज्याच्या कर्मचाऱ्यांना राबवाव्या लागतात. मात्र त्यांना केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात येत नाही. राज्य शासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही केंद्राच्या सुविधा देण्याची मागणी वर्धेतील कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलनातून केली. येथील राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी भोजनाच्या अवकाशात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत निदर्शने दिली. यावेळी विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. शासनाकडून आलेली विकास कामे करण्याकरिता राज्य व केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे सक्रीय सहकार्य आवश्यक आहे. असे असताना राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यात नाराजीचा सूर उमटमत आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नावर निर्णायक चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी सर्व संबंधित संघटनांशी चर्चेसाठी वेळ निश्चित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होते. (प्रतिनिधी)रिक्तपदे तत्काळ भरा४जिल्ह्यातील विविध कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे तातडीने भरण्यात यावी. राज्य कर्मचाऱ्याकरिता केंद्राप्रमाणे पाच दिवसाचा आठवडा करावा. १ जानेवारी २०१५ पासून केंद्राप्रमाणे ६ टक्के महागाई भत्ता वाढवावा. सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० वर्ष करावे, प्रशंसनीय कामाबद्दल १ जानेवारी २००६ पासून प्रलंबित असलेल्या आगाऊ वेतनवाढी देण्यात याव्या. ४निलंबनाकरिता असलेली मानीव कार्यपद्धती बंद करण्यात यावी. खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करावे. कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी उपलब्ध असलेली ‘मॅट’ यंत्रणा रद्द करू नये. केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, हॉस्टेल भत्ता राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी, यासह पेंशन, अनुकंपाच्या भरतीबाबातही मागण्या यावेळी करण्यात आल्या.