शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गावात पाचशेऐवजी आता पन्नासच बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला.

ठळक मुद्देराहिल्यात केवळ आठवणी : निम्न वर्धामुळे वाठोडाचे विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठोडा (खोंडे) या गावी ४ हजार लोकांची वस्ती होती. या गावामध्ये ५०० बैलजोड्या असल्याने त्यांचा मोठा पोळा भरायचा. हा पोळा तालुक्यामध्ये प्रसिद्ध होता. बैलजोड्यांची आकर्षक सजावट करणाऱ्यांवर बक्षिसांची लयलूट व्हायची.पण, हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे पुनर्वसन झाल्याने विभाजन करण्यात आले. परिणामी पोळ्याची मजाही गेली आणि पाचशे बैलजोड्यांच्या गावात आता यांत्रिकीकरणामुळे ५० बैलजोड्याच शिल्लक राहिल्या आहेत.वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला. कालांतराने विविध जातीधर्मांचे लोकही या गावात वास्तव्यास आले. खोंडे परिवाराकडे या गावाची पाटीलकी असल्यामुळे या गावाला वाठोडा (खोंडे ) असे नामानिधान झाले. आजुबाजुचा प्रसन्न परिसर, सुपीक जमीन, आमराई तसेच या गावातील वाड्यांवरुन गावाची संपन्नता लक्षात यायची. ब्रिटिशांच्या काळात या गावाची मालगुजारी खोंडे परीवाराकडे होती. कालांतराने ही मालगुजारी डागा परिवाराकडे आली.चोहनदीच्या पात्रातील हनुमंताचे भव्य मंदिर तत्कालीन मालगुजार किसनदास डागा यांनी बांधले आहे. आजही हे मंदिर निम्न वर्धा धरणाच्या पाण्यात मजबूत स्थितीत डौलाने उभे आहे. एकोप्याने नांदणारे हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे हैबतपूर, अंबिकापूर व भाईपूर या तीन ठिकाणी पूनर्वसन झाले आहे.त्यामुळे पोळ्यासह इतरही सामूहिक कार्यक्रमांचा आनंद हिरावला आहे.तसेच यांत्रिकिरणालाही चालना मिळाल्याने आता सण, उत्सवावरही त्याचा परिणाम झाला आहे.वाठोड्यातून मिळाले तीनआर्वी तालुक्याच्या इतिहासात वाठोडा (खोंडे) या गावाला अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. या गावाने शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रामध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. या गावाने तीन आमदार दिले असून त्यामध्ये स्व.नारायणराव काळे, स्व.शरदराव काळे व माजी आमदार अमर काळे यांचा समावेश आहे. या गावातील अनेक व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत आहे. या गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भेट दिली आहे.महाप्रसादातही खंडयेथील वाळवंटातल्या महाप्रसादाचं सर्वांना महत्त्व होतं. अख्खं गाव या महाप्रसादाला उपस्थित रहायचं. भाकर, कन्या व डाळभाजीच्या जेवणाची मजा काही औरच होती. येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरायचा. तेथेच खेळाचे मैदान होते. क्रिकेट,व्हॉलीबॉल, विटी दांडू, सुरकांडी, आपडाफ, कंचे, कबड्डी, खुप्पस असे नानाविध खेळ खेळले जात. दरवर्षी आषाढीपासून सणांना सुरुवात व्हायची. या सणांना गावातील सर्व मंडळी गुण्यागोविंदाने साजरे करायचे.

टॅग्स :Socialसामाजिक