वाकलेल्या विद्युत खांबामुळे मोठ्या अपघाताची भीती

By Admin | Updated: June 22, 2017 00:45 IST2017-06-22T00:45:20+5:302017-06-22T00:45:20+5:30

स्थानिक सिव्हिल लाईन भागातील सेंट अ‍ॅनथॉनी नॅशनल स्कूल समोरील वाकलेल्या विद्युत खांबाकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

Fear of a big accident due to bent electrical bumps | वाकलेल्या विद्युत खांबामुळे मोठ्या अपघाताची भीती

वाकलेल्या विद्युत खांबामुळे मोठ्या अपघाताची भीती

सिव्हिल लाईन भागातील प्रकार : संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक सिव्हिल लाईन भागातील सेंट अ‍ॅनथॉनी नॅशनल स्कूल समोरील वाकलेल्या विद्युत खांबाकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सदर विद्युत खांबावर सध्या विद्युत तारा असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
शहरातील सिव्हील सेंट अ‍ॅनथॉनी नॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजाराच्या वर आहे. शहरातील धनदांडग्यांसह गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थीही तेथे शिक्षण घेतात. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर शाळेच्या मुख्य द्वारासमोरील विद्युत खांब काही वर्षांपूर्वी वाकला. वाकलेला विद्युत खांब काढून त्या ठिकाणी दुसरा सुस्थितीत असलेला विद्युत खांब लावणे व विद्युत तारा व्यवस्थित करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुख्य द्वारातून शाळा भरताना तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेत व शाळेबाहेर ये-जा करतात. वादळीवाऱ्यामुळे सदर विद्युत खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खांबावर विद्युत तारा असून हा प्रकार अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कुणाची?
वाकलेल्या विद्युत खांबाच्या दुरूस्तीकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. हा प्रकार अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वादळी वाऱ्यामुळे सदर विद्युत खांब कोसळून एखादी अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात असल्याने त्वरित दखल घेत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

सदर विद्युत खांब जवळपास चार वर्षांपासून वाकलेल्या स्थितीत आहे. त्यावरील विद्युत तारा डमी असून त्या लाईनची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगर परिषदेची आहे. त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी प्रकरण आपल्या विभागाकडे वळते व्हावे म्हणून आपण वेळोवेळी वर्धा न.प. प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे प्रकरण वळते करून घेण्यात यश मिळाले नाही.
- जे. एम. पैकीने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण वर्धा.

दोन वर्षांपासून दुरूस्तीकडे कानाडोळाच
जवळपास दोन वर्षांपूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सेंट अ‍ॅनथॉनी नॅशनल स्कूलच्या मुख्य द्वारासमोरील विद्युत खांब वाकला. हा लोखंडी खांब तेव्हाच झालेल्या दुरूस्तीच्या कामाच्यावेळी बदलविणे क्रमप्राप्त होते;पण वाकलेला खांब तसाच ठेवण्यात आला. झटपट वाकलेला विद्युत खांब बदलविण्याची मागणी आहे.

 

Web Title: Fear of a big accident due to bent electrical bumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.