शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

हिंगणघाट शहरात सोमवारी सकाळी घडलेल्या अमानवीय घटनेतील आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना पोलीस बॉईज महिला आघाडीच्या अध्यक्ष वर्षा श्रीरंग मारबते उपस्थित होत्या.

ठळक मुद्देविविध सामाजिक संघटनांचे राज्य शासनाला साकडे : मोर्चाच्या माध्यमातून हिंगणघाटच्या ठाणेदाराला शेकडो निवेदने सादर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट/वर्धा : हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, महिला संघटना यांनी निवेदनातून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. हिंगणघाट शहरात निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या संघटनांनी ठाणेदार सत्यवीर बंडीवार, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना निवेदन सोपविले. तर वर्धा येथेही जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो देण्यात आली.आरोपीला जामीन देऊ नका - पोलीस बॉईज असोसिएशनची मागणीवर्धा : हिंगणघाट शहरात सोमवारी सकाळी घडलेल्या अमानवीय घटनेतील आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना पोलीस बॉईज महिला आघाडीच्या अध्यक्ष वर्षा श्रीरंग मारबते उपस्थित होत्या. हिंगणघाट शहरात एका प्राध्यापिकेस पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना निंदनीय असून माणुकसीला काळीमा फासणारी आहे. अशा क्रूर प्रकरणांमधील आरोपीच्या कुटुंबाच्या सर्व सोयी-सवलती बंद करण्यात याव्या, असा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा. जेणेकरून, कुणीही असा प्रकार करण्यासाठी शंभरवेळा विचार करेल. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रिया ढोणे, वंदना नगराळे, मीनाक्षी बावणे, सविता उईके, कल्पना कुरसंगे, मेघा देशमुख, अर्चना मसराम, संगीता बेले, शीतल झाडे, कल्पना मंडारी, शालिनी मून, रंजिता भातकुलकर, वैशाली पाटील, सूरज बेले यांच्यासह असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.वर्धा : हिंगणघाट शहरात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देऊन पीडित युवतीला न्याय देण्यासाठी प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, जि. प. महिला बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, नगरसेविका श्रेया देशमुख, भाजपचे नेते अविनाश देव, मिलिंद भेंडे, जि.प. सभापती मृणाल माटे, माधव चंदनखेडे, वंदना भुते, जयश्री गफाट, ज्योत्स्ना सरोदे, नीता गजाम, पं.स. सभापती महेश आगे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात भाजपने म्हटले आहे की, अलीकडे घडलेल्या घटना पाहता मानसिक विकृतीच्या गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेनासी झाली आहे. क्लिष्ट न्यायालयीन प्रक्रियेमुळे पीडितांना न्याय मिळण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे. शिवाय माणुसकीला काळीमा फासणाºया घटना घडत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष घालून आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी करण्यात आली.महिला काँग्रेसचे एसडीओंना निवेदनहिंगणघाट : येथील जळीत प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना मंगला ठक, आशा कापटे, नलिनी महाजन, सुमन खाटे, कमल पाथर, इंदिरा पर्बत, सुमन धाबर्डे, गीता कोटकर, शेषराव लोणकर, गुड्डू शर्मा, तुकाराम कोल्हे, विद्या गिरी, दामिनी गिरी आदींची उपस्थिती होती.आरोपीला कठोर शिक्षा द्या- शिक्षक परिषदवर्धा : हिंगणघाट येथील घटनेमुळे महिला शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रा. अजय भोयर, एम. बी. इंगोले, पुंडलिक नागतोडे, संदीप चांभारे, परमेश्वर केंद्रे, रहीम शाह, अनिल टोपले, जयश्री पाटील, एस. जी. देशमुख आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी