शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST

मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे.

उपाययोजना करण्याबाबत वन विभाग उदासीननारायणपूर : मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे. परंतु हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याने चित्र नारायणपूर परिसरात पहावयास मिलत आहे. वन्य प्राण्यामुळे सध्या नारायणपूर परिसरातील शेतकरी असुरक्षित झाले आहे. स्वत:चे शेतातील पिकाचे संरक्षण करणेही अवघड झाले आहे. पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी पिकाचे लेकरासारखे पालन पोषण करतो. त्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. पण पीक एक उत्पादनावर आल्यावर वन्यप्राण्यांचा उप्रदव सुरू होत असून त्याला रोखण्यात शेतकरी असमर्थ ठरत आहे. रानडुक्कर, रोही, माकड, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा नारायणपूर परिसरात मुक्तसंचार पाहावयास मिळतो. सुरुवातीला हे प्राणी फटाक्याच्या आवाजाने घाबरून पळून जायचे. पण आता हा आवाज त्यांच्या परिचयाचा झाला आहे. मौजा गणेशपूर येथे वन विभागाने १५ वर्षापूर्वी नर्सरी तयार केली. आज त्याचे रुपांतर जंगलात झाले असल्याने वन्य प्राण्याचा हैदोस वाढला आहे. जंगल शेजारची शेकडो हेक्टर शेती पडिक होण्याच्या स्थितीत आहे. या जंगली प्राण्यापासून शेतातील पीके तर सोडा, स्वत:चा जीव वाचविणे सुद्धा कठीण झाले आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहे तर दुसरीकडे जंगलात दबा धरून बसलेले हिंस्र प्राणी दुधाळ जनावरे फस्त करीत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकरी मात्र काही करू शकत माही. मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्याची मनधरणी करनेच त्यांच्या हाती आहे. वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वन्य प्राण्यांना मारू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण व्हावे, शेतशिवारात सदर प्राणी भटकू नये यासाठी उपाययोजना आखणे अत्यावश्यक आहे. तसेच जंगलाच्या अगदी शेजारीच असलेल्या शेताना वनविभागाने तारेचे कुंपण १०० टक्के अनुदानावर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतु वन विभाग देत असलेल्या तुटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या घातक कायद्यात बदल करून शेतकऱ्यानाही संरक्षण देण्यात यावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे आणि वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)