शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून बैलजोडीलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसात नवीन सालगड्यासह नवीन बैलजोडी खरेदी करण्यावर भर देतात. मराठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, याकरिता शेतकरी बैल किंवा बैलजोडी खरेदीवर भर देतात. त्यामुळेच या दिवसात ठिकठिकाणी बैलबाजार भरतो. केळझर येथेही गेल्या तीन दिवसांपासून बैलांची दावण लागली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून बैलांची दावण : यांत्रिकीकरणातही मागणी कायम

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : शेतकरी आणि बैल हे दोघेही एकमेकांचे मित्र समजले जात असल्याने दोघांशिवाय शेतीची मशागत अश्यकच आहे. दरम्यानच्या काळात शेतीकरिता यात्रिकरणावरच भर दिल्या जात असतांनाही सर्वच कामे यंत्राणे करणे शक्य नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीकरिता आजही शेतकऱ्यांकडून बैलाची मागणी होत आहे. बैलांच्या किंमती सध्या वाढलेल्या असतानाही घरातील खुट्याला बैलाशिवाय पर्याय नसल्याचे सांगतात.शेतकऱ्यांकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसात नवीन सालगड्यासह नवीन बैलजोडी खरेदी करण्यावर भर देतात. मराठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, याकरिता शेतकरी बैल किंवा बैलजोडी खरेदीवर भर देतात. त्यामुळेच या दिवसात ठिकठिकाणी बैलबाजार भरतो. केळझर येथेही गेल्या तीन दिवसांपासून बैलांची दावण लागली आहे. येथे ६० हजार रुपयांपासून १ लाखांपर्यंत बैलजोडीची किंमत आहे. काही वर्षांपासून शेतकरी बैलजोडी विकून यंत्राच्या सहाय्याने शेती करायला लागला. मात्र, महागाईमुळे आणि बहुतांश शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे पाठ फिरविल्याने पुन्हा सरजा-राज्याच्या जोडीकडेच लक्ष केंंद्रीत केले आहे. बैलजोडीशिवाय शेतीला गती नाही. तीनही ऋुतूमध्ये बैलजोडीने मशागत करणे शक्य होत असल्याने बैलांच्या खरेदीकरिता गर्दी वाढली आहे. उन्हाळवाहीचे काम सुरु झाले असून याकरिता दमदार बैल किंवा बैलजोडी खरेदी केली जात आहे. काही शेतकरी त्यांच्याकडील जुन्या जोडीच्या मोबदल्यात अधिकचे पैसे देऊन नवीन बैलजोडी खरेदी करीत आहे. काही शेतकरी या दावणीतील बैलांना बैलबंडीला किंवा वखराला जुंपून तो शेतीयोग्य आहे किंवा नाही याची पारख करण्यासाठी बैलविक्रेतेही मुभा देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी