भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 15:46 IST2018-09-16T15:44:21+5:302018-09-16T15:46:44+5:30
शेतात बैलगाडी घेऊन जात असताना मजरा बसस्टॉपवर मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे

भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
वर्धा - शेतात बैलगाडी घेऊन जात असताना मजरा बसस्टॉपवर मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बैलगाडीवरील शेतकरी भिकुजी उकंडराव ढवळे (55) यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दहा वाजता ही घटना घडली.
ढवळे नेहमीप्रमाणे सकाळी बैलगाङी घेऊन शेतात जात होते. वर्धा-आर्वी मार्गाने रस्त्याच्या कडेने बैलगाडी नेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जेरदार धकड दिली. यामध्ये ढवळे यांचा मृत्यू झाला तर बैलगाडी तुटल्याने बैल दोन बाजूला फेकले गेले. या घटनेत बैल किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली. शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.