शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:00 AM

पशुप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्याकरिता डॉ. संजय अंदुरकर, डॉ. नितीन फुके, डॉ. मनोज पाटील, डॉ. काळे यांच्या चार सदस्यीय तज्ज्ञ निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. जनावरांची विभागणी गवळाऊ वळू, गवळाऊ कालवड आणि गवळाऊ गाय, अशा तीन विविध गटांमध्ये करून स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । दादाराव केचे, स्पर्धेत १ लाख ११ हजारांच्या पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मो.) : गवळाऊ पशुपालकांना प्रोत्साहित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने काम केले जात आहे. त्यामुळे पशुपालकांचा पशु पालनाकडे कल वाढलेला आहे, असे प्रतिपादन आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी केले. वर्धा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आर्वी पंचायत समितीच्या पुढाकारातून जातिवंत गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा खरांगणा येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पशुप्रदर्शन आणि गवळाऊ दुग्ध स्पर्धेत एकूण १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस पशुपालकांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून दादाराव केचे, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, मावळत्या सभापती नीता गजाम यांच्यासह प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, आर्वी पंचायत समितीचे सभापती हनुमंत चरडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, सुनीता चांदुरकर, ज्योती निकम, उज्व्जला देशमुख, अर्चना टोणपे, सुकेशनी धनवीज, पं.स. सदस्य नितीन अरबट, बाबाराव अवथळे, खरांगणाच्या सरपंच ज्नीलिमा अक्कलवार, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, गजानन निकम, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे आदी उपस्थित होते.पशुप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्याकरिता डॉ. संजय अंदुरकर, डॉ. नितीन फुके, डॉ. मनोज पाटील, डॉ. काळे यांच्या चार सदस्यीय तज्ज्ञ निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. जनावरांची विभागणी गवळाऊ वळू, गवळाऊ कालवड आणि गवळाऊ गाय, अशा तीन विविध गटांमध्ये करून स्पर्धा घेण्यात आली. या निवड समितीने प्रत्येक जनावरांचे सखोल परीक्षण करून त्यामधील उत्कृष्ट नऊ जनावरांची निवड केली.